womens Talking File Photo esakal
नाशिक

SAKAL Special: चालता-बोलता

सकाळ वृत्तसेवा

शेजाऱ्याचा जांगडगुत्ता

व्यक्ती-व्यक्तींमधील नात्यात किंवा एखादी गोष्ट स्पष्टपणे लक्षात न येण्याच्या प्रक्रियेला विदर्भामध्ये ‘जांगडगुत्ता’ असे म्हटले जाते. परंतु उर्वरित महाराष्ट्रात जांगडगुत्त्याचा अर्थ भलताच घेतला जातो.

विशेष करून स्त्री व पुरुष यांच्या संबंधाबाबत तर जांगडगुत्ता हा शब्द अधिकच तीव्रपणे जाणवतो. नाशिक शहराच्या उच्चभ्रू भागात विदर्भातील असेच एक जोडपे नव्याने वास्तव्याला आले आहे.

पुरुषवर्ग दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असताना महिलावर्ग कामे झाल्यानंतर सोसायटीमधील महिलांबरोबर रमतात. विदर्भातून आलेल्या नवदांपत्याच्या जोडीतील महिलेला आपल्यासोबत सामावून घेताना सोसायटीतील महिलांना एका चांगल्या विनोदाचा अनुभव आला.

त्याचे झाले असे, महिलावर्ग दुपारच्या वेळेस गप्पा मारत असताना विदर्भातील त्या महिलेला नवऱ्याबद्दल गमतीशीर गोष्टी सांगताना विदर्भात राहत असलेल्या त्यांच्या शेजारील बाईसोबत भांडण झाल्याचे किस्से कथन केले.

त्यामध्ये ‘लय बाई मा नवऱ्याचे जांगडगुत्ता त्या बाईबरोबर होता’, असे म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

एवढं प्रकरण माहीत असूनही ही बाई एवढी बिनधास्तपणे नवऱ्याबद्दल बोलते, याबद्दल काहींना आश्चर्य देखील वाटले. मात्र जांगडगुत्ता शब्दाचा अर्थ स्पष्टपणे समजल्यावर एकमेकींना टाळ्या देत विषय मिटविला.

अनवट वाटेवरील वाटसरू

आयुष्यातील सर्वच दिवस एकसारखे नसतात. ऊन-सावलीचा खेळ सुरू असल्याने त्याप्रमाणे लोक वागतात. सृष्टीचा बदल स्वीकारून पुढे चालत राहतात.

एवढे सगळे तत्त्वज्ञान सांगण्यामागे एकच कारण आहे अन् ते म्हणजे, ज्या मोर्चेकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी पोलिस अहोरात्र प्रयत्न करत होते त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या गाडीत घेऊन आले.

मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत यशस्वी चर्चा केली. मग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला. तिथेच पोलिसांचे काम संपले. आपल्या गाडीत आलेल्या मोर्चेकऱ्यांना त्यांच्या साथीदारांपर्यंत सोडविण्याचा त्रासही करून घेतला नाही.

शेवटी गाडीची वाट बघण्यापेक्षा आपण चालत जाऊ, असे म्हणत शेतकऱ्यांनी परतीचा मार्ग निवडला. अगदी आयुष्याच्या अनवट वाटेवरून निघालेल्या वाटसरूंसारखे...

पुरस्काराची लई भारी हौस

सामाजिक क्षेत्रात काम करताना काही जणांना केलेल्या कामांचा गवगवा करण्याचा अन् त्या माध्यमातून विविध पुरस्कार मिळण्याची मोठी हौस असते. त्यासाठी काही लोक देखावा करतात. यात अनेकदा न केलेली कामे दाखवून पुरस्कार पटकविले जातात.

सामाजिक क्षेत्रातील हाच कित्ता आता शासकीय कार्यालयातील अधिकारी गिरवू लागले आहे. झाले असे, की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या प्रशासकीय राज सुरू आहेत. यातील मिनी मंत्रालयात एक वरिष्ठ अधिकारी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत, स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.

अगदी मुंबई, दिल्लीपर्यंत या अधिकाऱ्यांने आपल्या उपक्रमाचा गवगवा केला आहे. यातून शासन पातळीवरचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले.

यातच एका मोठ्या संस्थेचा पुरस्कारासाठी प्रस्ताव बनविण्याचे काम या अधिकाऱ्याचे सुरू असून, त्यासाठी राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण योजनेचा रिझल्ट आलेला नसताना तो दाखविला जात आहे. त्यावर कर्मचारीवर्ग त्रस्त झाला आहे.

यातील एका कर्मचाऱ्यांने अधिकाऱ्यास पुरस्काराची लई भारी हौस आहे, शासनाचे काम करत आहात की पुरस्कारासाठी काम करता हेच कळत नाही, असा उपरोधिक टोला हाणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT