Nashik ZP News  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता...

महाभारतात धर्म रक्षणानुसार आचारण करण्याबाबत श्रीकृष्ण भगवानाने सातत्याने उपदेश केलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘झेडपी’चा श्रीकृष्ण आहात

महाभारतात धर्म रक्षणानुसार आचारण करण्याबाबत श्रीकृष्ण भगवानाने सातत्याने उपदेश केलेला आहे. महाभारतात धर्मयुद्धास अर्जुनाला प्रवृत्त करण्यास केलेला हाच उपदेश भगवतगीता म्हणून ओळखला जातो. भगवतगीतेतील हाच संदर्भ अनेकदा दिला जातो.

त्याबाबत झाले असे, की जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यात सामान्य प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने समुपदेश पद्धतीने ही प्रक्रिया राबविल्याबद्दल त्यांचे आरोग्य संवर्गातील विविध संघटनांनी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती देऊन सत्कार केला.

ही मूर्ती देण्यामागील भावना व्यक्त करताना या वेळी एका कर्मचाऱ्याने त्यांना थेट, आपण ‘झेडपी’चे श्रीकृष्ण आहात. आपल्यामुळेच ‘झेडपी’चे चांगेल कामकाज सुरू असल्याचे सांगितले. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला.

(SAKAL Special chalta bolta You are Shrikrishna of ZP nashik )

किमान आम्हाला तर माहिती देत जा!

आयोजकांचाच विसर पडवा इतकी घाई काही लोकांना झालेली असते. नाशिकमध्ये प्रथमच युवा महोत्सव होत आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांमागे कामाची घाई लागली आहे. त्यात पत्रकार परिषदाही घ्यायच्या म्हटल्यावर अपडेट माहिती तर असायला हवी म्हणून एका एजन्सीची नेमणूक करण्यात आली.

त्यांच्याकडे परिषदांचे नियोजन दिले; पण परिषद आयोजनाच्या नादात परिषद घेणाऱ्या अधिकाऱ्यांनाच सांगण्याचा विसर पडतो त्या वेळी अधिकारीही अवाक होतात. अरे, किमान आम्हाला तरी अगोदर सांगत जा, नाहीतर आमचीच फसगत व्हायची. अधिकाऱ्यांची ही अवस्था असेल, तर बाकीच्यांनी विचार न केलेलाच बरा, आता बोला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT