Jitendra Awhad esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता

श्रीराम वनवासात असताना शिकार करून खात होते, असं वक्तव्य आमदार जितेद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणातून केले अन्...

सकाळ वृत्तसेवा

शरद पवारांना आमंत्रण नाही, म्हणून त्यांचं बेताल वक्तव्य

श्रीराम वनवासात असताना शिकार करून खात होते, असं वक्तव्य आमदार जितेद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणातून केले. यानंतर त्यांच्यावर नागरिकांच्या तीव्र भावनांच्या निषेधाचा पाऊस सोशल मीडियावर पडायला लागला.

राजकारण करताना राजकारणी एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक करतच असतात. मात्र आता तर त्यांनी देवालाही सोडलं नाही. त्यांनी खरंच आणि किती रामायण वाचलं आहे, हे त्यांच त्यानांच ठाऊक.

मात्र अशा वक्तव्याने रामभक्तांच्या भावना दुखवून त्यांना नेमकं साधायचयं काय, बहुधा शरद पवारांना राममंदिर प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण आलं नाही. त्यामुळे ते असं बेताल वक्तव्य करत असतील, अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. (SAKAL Special jitendra awhad controversial statement over sri ram chalta bolta political nashik)

एकाच कार्यक्रमात दोन अध्यक्ष

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले. त्यामुळे एकाच पक्षाचे दोन-दोन अध्यक्ष, कार्याध्यक्ष झाल्याने कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे.

एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे अध्यक्ष एकाच व्यासपीठावर विराजमान झाले. त्यामुळे कार्यकर्ते अन्‌ सूत्रसंचालकाची चांगलीच अडचण झाली. आता कोणाला अध्यक्ष म्हणायचे.

एकाला म्हटले, तर दुसऱ्याला राग आणि दुसऱ्याला म्हटले तर पहिल्याला राग. मग सूत्रसंचालकाने शक्कल लढवली. अगोदरच्या अध्यक्षांकडे आता शिक्षण संस्थेचे संचालकपद आले आहे, त्यांना संचालक म्हणून गौरवले.

तर दुसऱ्यांना नवनिर्वाचित अध्यक्ष म्हटले. दोघांचीही मनधरणी करत सूत्रसंचालकाने समतोल साधला त्यामुळे आता दोन्ही गटांचे नेते त्यांच्यावर फार खूश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT