Suttar Feni
Suttar Feni esakal
नाशिक

SAKAL Special : मालेगावच्या सुत्तरफेणीची बातच न्यारी! सणामुळे गोडवा काहीसा महाग

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Special : रमजान ईदला घराघरात शिरखुर्मा बनविला जातो. तो बनवीत असताना त्यामध्ये हक्काने टाकला जाणारा घटक म्हणजे सुत्तरफेणी. शिरखुर्मा बनविताना सुत्तरफेणीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

तर सुत्तरफेणीमुळे शिरखुर्मा चविष्ट होतो. या सुत्तरफेणीसाठी मालेगाव हे कसमादे, उत्तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण राज्य व देशात प्रसिद्ध आहे. येथील सुत्तरफेणीची बातच काही न्यारी आहे. (SAKAL Special Malegaon Suttarpheni most famous expensive cause inflation nashik news)

रमजान ईदच्या सणात दुधाची मोठी उलाढाल होते. रमजान ईदला शिरखुरर्म्याला लागणाऱ्या साहित्याची बाजारपेठ मालेगावात सजली आहे. काजू, बदाम, किसमिस, खोबरे, तुररी बरोबर शिरखुर्म्याचा गोडवा वाढविणारी सुत्तरफेणीची मालेगावात हवा आहे.

सुत्तरफेणीचे विविध प्रकार विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहे. यात सुत्तरफेणी, रंगीत फेणी, सेवईया, चुंबल, गोडफेणी, बनारसी सेवईया, लच्चा, विविध रंगांची फेणी अशी सुत्तरफेणी मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडते.

गरीब- श्रीमंत अशा सर्वच कुटुंबात आवडीने सुत्तरफेणी खाल्ली जाते. येथे सुत्तरफेणी बनविण्याची लगबग मोठ्या प्रमाणात सुरु झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तूप, मैदा, सिलिंडरचे भाव वाढल्याने सुतरफेणीचा गोडवा काही प्रमाणात महागला आहे.

शहरात नुमानी नगर, रौनकाबाद, मोहम्मद अली रोड, आयेशानगर, गवळीवाडा, रमजान पुरा, विजयनगर, नवापुरा, आझाद नगर अशा वीस पेक्षा अधिक ठिकाणी सुत्तरफेणी तयार केली जाते. शहरात मोहम्मद अली रोड, किदवाई रोड, सरदार मार्केट, कुसुंबा रोड, पवारवाडी, रमजानपुरा, देवीचा मळा, आझाद नगर, चंदनपुरी गेट आधी ठिकाणी सुतरफेणी विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

रमजान ईदच्या एक दिवस अगोदर (चांदरात) सर्वाधिक सुतरफेणीची विक्री होते. बाहेर गावाहून कपडे खरेदीसाठी आलेले नागरिक हमखास सुतरफेणीची खरेदी करतात.

आगाऊ बुकिंग

शहरातील बडीबी की दुकान सुत्तरफेणीसाठी प्रसिद्ध आहे. १९३७ मध्ये बिटान लालताप्रसाद गुप्ता यांनी या दुकानाची सुरवात केली होती. मालेगातील सर्वात पहिले व उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे सुत्तरफेणीचे दुकान आहे.

येथून नाशिक, सटाणा, मनमाड, नांदगाव, जळगाव, पुणे, नगर, कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, खंडवा, खरगोन, सेंधवा, सुरत, इंदौर या शहरांत सुत्तरफेणी विक्रीसाठी पाठविली जाते. येथील घाऊक व्यापाऱ्यांनी मालाची आगाऊ बुकिंग केली आहे.

सुतरफेणीचा भाव :

१ किलोसाठी : १४०, १६०, २०० रुपये
१० किलो : १३००, १५००, १८०० रुपये

"नव्वद वर्षांपासून हाच व्यवसाय आहे. चौथी पिढी सुत्तरफेणी विक्री करत आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये मालेगावच्या सुत्तरफेणीची मागणी असते आहे. आमच्या येथे उत्तमप्रतीचा माल बनवून शुद्धतेला प्राधान्य दिले जाते. रमजान ईदमुळे व्यापाऱ्यांकडून दहा टनांपर्यंत सुत्तरफेणीची बुकिंग करण्यात येते." - श्रीमती बिटान गुप्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT