teacher Recruitment
teacher Recruitment esakal
नाशिक

SAKAL Special: जिल्ह्यात शिक्षण विभागाची अनेक पदे रिक्त! पदोन्नतीच्या कार्यवाहीची प्रतिक्षा; अनेकांकडे अतिरिक्त पदभार

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर पर्यवेक्षीय यंत्रणेसह शिक्षकांमधून पदोन्नती होणारे अनेक पदे रिक्त आहेत.

मागील तीन वर्षांपासून पदोन्नत्या न झाल्याने रिक्त पदांवर शिक्षकांकडूनच प्रभारी पद देवून कामकाज केले जात असल्याने पदोन्नती कधी होईल याच प्रतिक्षेत जिल्ह्यातील शिक्षक आहेत. (SAKAL Special Many posts of education department vacant in district Awaiting promotion proceedings Many have additional responsibilities nashik)

शिक्षण क्षेत्रातील पर्यवेक्षकीय यंत्रणेतील समन्वयक म्हणून केंद्रप्रमुख जबाबदारी पार पाडत आहे. तसेच पदवीधर व तत्सम शिक्षकांकडे देखील अपुरे शिक्षक असल्याने अनेक पदांचा अतिरिक्त भार आहे.

परिणामी वर्ग अध्यापन करून केंद्राची माहिती संकलन करावी लागत आहे. आधीच रिक्तपदे त्यातच ऑनलाइन व इतर वाढलेली प्रशासकीय कामकाज यामुळे 'प्रभारी' मंडळीचीही शाळा व वर्ग सांभाळून एकंदरीत केंद्र प्रमुख पदावर कसरत करावी लागत आहे.

परिणामी या सर्वांचा परिणाम वर्ग अध्यापनावर होत असतो. काही तालुक्यात तर विस्तार अधिकारीच संपूर्ण तालुक्याचा कार्यभार सांभाळत आहेत.

जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर विषय शिक्षक या पदांवर प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नती करण्यात यावी.

सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचे आदेश

केंद्रप्रमुख यास जिल्हा परिषदेच्या दहा शाळांचे पर्यवेक्षण व साप्ताहिक सहा तासांचे किमान अध्यापन करणे बंधनकारक असते.

पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापकांचे व केंद्रप्रमुखांचे उपरोक्त कामकाज लक्षात घेता, पदवीधर प्राथमिक शिक्षकास केंद्रप्रमुख अथवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते.

त्यामुळे त्यांना एक वेतनवाढ देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात केंद्रप्रमुख हे महत्त्वाचे पद असूनही शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता विषयनिहाय पदोन्नतीचे धोरण राबवून बेकायदेशीरपणे पदोन्नतीची यादी प्रसिद्ध केली होती.

त्यामुळे त्या निर्णयाविरोधात न्यायालयात शिक्षकांकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. खंडपीठाने त्या याचिकेची गंभीर दखल घेत विषयनिहाय पदोन्नती अनेक शिक्षकांवर अन्याय करणारी असल्याने सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्याबाबतचे आदेश दिले होते.

"जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या १२२ पदांपैकी ९३ पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तालुकानिहाय सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक या निकषाने निर्धारित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व संवर्गातील रिक्त पदांबाबत पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात येईल."

- डॉ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी,जि.प.नाशिक.

"जिल्ह्यातील शिक्षण विभागात अनेक जागा भरलेल्या नाही. प्रत्यक्ष शालेय पातळीवर प्रशासनिक व सनियंत्रणास केंद्रप्रमुख महत्त्वाचे असतात. संघटनेमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जातो. प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी."

- महारू निकम, विभागीय अध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघटना

"मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या पदांवर बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी देऊन शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रशासनाचे कामकाज सुरळीत चालल्याने प्रशासन पदोन्नती प्रक्रिया राबविण्यास टाळाटाळ करते. विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त कोणताही पदभार न देण्याचा शासन निर्णय आहे."

- संजय पगार, राज्य कोषाध्यक्ष: प्राथमिक शिक्षक परिषद.

दृष्टीक्षेपात विविध संवर्गातील पदे

पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत रिक्त

शिक्षण विस्तार अधिकारी १२४ ५० ७४

केंद्रप्रमुख १२२ २७ ९५

मुख्याध्यापक ६३९ ३८५ २

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT