Nilesh Surana esakal
नाशिक

SAKAL Special: सर्वसमावेशक विचारातून नैराश्‍यासह चिंता करता येते दूर : नीलेश सुराणा

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Special : आपण निरनिराळी ओळख घेऊन जगत असतो. त्यातून एकटेपणा येतो आणि मीपणातून नैराश्‍यासह चिंता आपणाला ग्रासतात. हे सारे प्रश्‍न सर्वसमावेशक विचारातून सुटू शकतील.

त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला संवाद साधावा लागेल. त्यातून समाजाला तुमची मदत होईल, असे प्रतिपादन दैनंदिन आयुष्यात मनःस्वास्थ पेरणारे प्रेरणादायी व्याख्याते नीलेश सुराणा यांनी बुधवारी (ता. २८) येथे केले. (SAKAL Special Nilesh Surana session Holistic Thinking Can Treat Anxiety with Depression By nashik)

‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयात झालेल्या संवादावेळी श्री. सुराणा यांनी चिंता, नैराश्‍य कमी करणे आणि लोक एकमेकांच्या मदतीला जातील, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अधोरेखित केले.

पर्यावरणीय, सामाजिक, स्वतः अशी आपली विभागणी झाली आहे, असे सांगून श्री. सुराणा म्हणाले, की गरजेपेक्षा अधिक पर्यावरणाचा आपण वापर करत आहोत. निसर्गाचा आस्वाद घेत आहोत. मात्र निसर्गाला परत काही देत नाही.

त्यातून ही विभागणी झाली आहे. तसेच गरीब-श्रीमंत, जात, नोकरी, स्त्री-पुरुष आदी स्वरूपाची सामाजिक विभागणी झाली आहे. एक दुसऱ्यांशी तुलना करू लागल्याने स्वतःची विभागणी झाली आहे. दरी रुंदावत चालल्याने ताण वाढत आहे.

घरी शांततेसाठी जात असलो, तरी विभागलेल्या मनाने जातो. त्यामुळे शांतता मिळत नाही. शिवाय कुटुंबांचे विभाजन होत चालले असून, काही लोक आता एकटे राहायला लागले आहेत. एकटेपणा जाणवतो आहे.

रात्री लवकर झोप येत नसल्याने झोप येण्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात. आजार बळावत आहेत. म्हणजेच काय, तर प्रगती करूनही एकटेपणाने ग्रासले आहे. मीपणामुळे त्रास वाढत असताना लोकांना मीपणा आवडत नाही, हे ध्यानात घ्यावे लागेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकटेपणात शेवटचा मित्र उरलाय मोबाईल

अहंकारामुळे आपण कुणीशी संवाद साधत नाही. दुसऱ्याशी बोलण्याऐवजी स्वतःशी बोलत राहतो. मीपणाचा वापर वाढल्याने शेवटचा मित्र मोबाईल उरला आहे. त्यामुळे जेव्हा मीपणा संपेल तेव्हा मोबाईल संपलेला असेल, असे सांगून श्री. सुराणा म्हणाले, की मनुष्य जन्माला येतो तो जग जिंकण्यासाठी.

पण लहानपणापासून त्याला मीपणाचे प्रशिक्षण मिळते. त्यातून मनुष्य एकटेपणात राहणे पसंत करतो. त्यावर उपाय म्हणून गरज काय आहे, माझा उपयोग कसा होईल याचा अधिक विचार करावा. लोकांसाठी मी काय करू शकतो, हे महत्त्वाचे आहे.

म्हणजे, तुमचा उपयोग आहे. मुळातच, विरोधी स्वभावाचे लोक चांगल्या पद्धतीने एकत्र पुढे जाऊ शकतात. त्यामुळे विरोधकांच्या विचारावर प्रेम करायला हवे. भूतकाळाला उजाळा देण्यापेक्षा भविष्याची चाहूल लागताच त्यादिशेने जावे.

भविष्याची चाहूल लागण्यासाठी मीपणा सोडून दुसऱ्याचे ऐकायला शिकले पाहिजे. परिणामी, मीपणाच्या ओझ्याखाली दबून येणारी उदासीनता संपुष्टात येईल. सन्मानासाठी मी केले हे सांगण्याची गरज उरणार नाही.

प्रेरणादायी व्याख्यानासाठी संपर्क

व्याख्याते : नीलेश सुराणा

मोबाईल क्रमांक : ९४२२७ ०६७५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Alternative India : एलपीजीला नवा स्वस्त पर्याय! महागड्या सिलिंडरपासून सुटका, इथेनॉलवर बनणार स्वयंपाक; सरकारची योजना ठरणार गेमचेंजर

मुलाने लग्नाचा निर्णय सांगितल्यावर प्रसाद-मंजिरीने दिलेली अशी प्रतिक्रिया; "तो खूप इमोशनल झाला"

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

SCROLL FOR NEXT