Sheikh couple praying for Shiv Sena's future in Ajmer esakal
नाशिक

शिवसेनेसाठी मुस्लीम दाम्पत्याचे तुळजाभवानी सह अजमेर दर्ग्याला साकडे

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. ते असतांना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नारायण राणे (Narayan Rane), राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बंड केलेले व त्या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत शिवसैनिक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्यभरात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यांच्या बंडामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे. (sakde to Ajmer Dargah along with Tulja Bhavani by Muslim couple for Shiv Sena Nashik News)

आमदारांना सोबत घेत बंड केल्याने शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यामुळे शिवसेनेवर संकटाचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे तर काही शहरात शिवसैनिक पक्षावरील संकट टळण्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना फेसबुक लाईव्ह मार्फत भावनिक साद घातली होती. मात्र राज्याचं चित्र बदलत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याच सगळ्यात आता अनेक शहरात शिवसैनिक देवाला साकडं घालताना दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड करतांना सामान्य शिवसैनिक मात्र प्रचंड भांबावला गेलाय, शिवसेनेला पुन्हा वैभव प्राप्त व्हावं, आलेल्या संकटाला तोंड देत उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्य साठी पुन्हा सत्ता •प्राप्तीसाठी सायखेडा ता निफाड येथील दोघेही ग्रामपालिका सदस्य असलेले शिवसैनिक श्री आशपाक शेख व त्यांच्या पत्नी सौ समीना शेख यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजापूर येथील तुळजाभवानी माता तसेच मुस्लीम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अजमेर येथील दर्गा येथे प्रार्थना केली.

"बंडखोर आमदारांनी शिवसेनेसोबत दगाबाजी करत सत्ता मिळवली तरीही सर्वसामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांचे सोबत आहे. शिवसेना पुन्हा एकदा फिनिक्स पक्षा प्रमाणे भरारी घेईल." - सौ समीना व श्री अशपाक शेख, ग्रामपालिका सदस्य, सायखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT