Historical Shiva fort here. esakal
नाशिक

Nashik News : जागतिक वारसा स्थळासाठी साल्हेरचा प्रस्ताव; ऐतिहासिक किल्ल्याचे भाग्य उजळणार

राज्यातील ११ किल्ल्यांसह तमिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने नुकताच प्रस्ताव पाठविला आहे.

प्रशांत बैरागी -सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील ११ किल्ल्यांसह तमिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने नुकताच प्रस्ताव पाठविला आहे. यात बागलाणमधील साल्हेर किल्ल्याचा समावेश आहे.

त्यामुळे भविष्यात साल्हेर किल्ल्याचे भाग्य उजळणार असल्याने आदिवासी बांधवांसह शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. (Salher proposal for World Heritage Site in baglan nashik news)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व आठवणी साल्हेर येथील किल्ल्यांत जतन करून ठेवल्या आहेत. राज्यातील सर्वांत उंच किल्ला म्हणून साल्हेरची ओळख असल्याने अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी प्रथम पसंती देतात. या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आदिवासी बांधव, पर्यटक, इतिहासप्रेमी यांनी व्यक्त केली आहे.

नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून, या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास शिवप्रेमींना आहे.

साल्हेर मिनी महाबळेश्वर..!

साल्हेर परिसरात पावसाळ्यात आल्हाददायक वातावरण असल्याने मिनी निसर्गाने जमीन सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. हरणबारीच्या घाटापासून थेट साल्हेर चिंचलीपर्यंत अनेक लहान-मोठे धबधबे पाहायला मिळतात. साल्हेर किल्ल्याच्या व चिंचली घाट परिसरात हजारो फूट उंचीवरून कोसळणारे आकर्षक धबधबे आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांवर, साल्हेर मुल्हेर किल्ल्यावर डोळ्यांचे पारणे फेडणारी विविध रंगांची आकर्षण फुले पाहायला मिळतात. पावसामुळे सारा परिसर हिरवागार झाल्यामुळे ‘हिरवळ दाटे चोहीकडे’ असे चित्र असते.

''साल्हेर किल्ला युनेस्कोच्या प्रस्तावात गेल्याने मनस्वी आनंद झाला. यामुळे किल्ल्याचे पडिक दरवाजे, डोंगर देवाची गुहा वाचेल. मागील बाजूस संरक्षक कठडे बसतील. भविष्यात मराठा युद्धात सहभागी झालेल्या ज्ञात-अज्ञात वीरांच्या पराक्रमाचा विजयस्तंभ पाहायला मिळेल.

भावी काळात युनेस्को मान्यता देईल, यात संशय नाही; परंतु साल्हेरची मूळ गरज ओळखून विकास करावा. याआधी कमळबारीवरील दुसऱ्या, तिसऱ्या दरवाजाचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, एक पाण्याचे टाके बुजवून टाकले आहे.''- रोहित जाधव, दुर्ग अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT