Sameer-Bhujbal esakal
नाशिक

Sameer Bhujbal : बाजार समितीचा निकाल परिवर्तनाची नांदी ठरेल : समीर भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Sameer Bhujbal : नांदगाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनता ही सध्याच्या नेतृत्वामुळे त्रस्त असून ग्रामपंचायत, सोसायटीसह शेतकरी बांधवांनी महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलवर विश्वास दाखवून निर्विवाद सत्ता दिली.

त्यामुळे बाजार समितीची ही निवडणूक आगामी विधानसभा मतदार संघातील परिवर्तनाची नांदी ठरेल असे मत माजी खासदार समीर भुजबळ यांनी रामकुंज बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. (Sameer Bhujbal statement on manamad Market committee election result nashik news)

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांच्यासह परिवर्तन पॅनलचे सर्व विजयी उमेदवार, दोन अपक्ष उमेदवार उपस्थित होते. समीर भुजबळ म्हणाले, परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे.

नांदगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी दडपशाही, झुंडशाही आणि दबावाला कंटाळून विकासाच्या बाजूने कौल देत परिवर्तन केले आहे. नांदगाव बाजार समितीत जरी पराभव झाला असला तरी चांगली लढत पॅनलने दिली.

अतिशय कमी फरकाने उमेदवार यात पराभूत झाले आहे. छगन भुजबळ हे माझ्यासमोर शून्य असल्याच्या आमदार सुहास कांदे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, आजवर साहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शून्यातून सर्व निर्माण होत असते त्यामुळे भुजबळांना कुणी शून्याची किंमत समजू नये. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करून आता आमदारकीचा राजीनामा द्यावा म्हणजे २०२४ ला आमच्यावर जो गुलाल पडणार आहे तो २०२३ लाच पडेल असे त्यांनी नमूद केले.

यावेळी व्यापारी गटाचे दोन्ही अपक्ष उमेदवार किसनलाल बंब, रूपेश ललवाणी यांनी समीर भुजबळ, गणेश धात्रक यांची भेट घेऊन परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला. त्यामुळे आता महाविकास आघाडीने १५ जागा लढवून १२ जागांवर विजय मिळविला होता. आता यात दोन अपक्षांची भर पडल्यामुळे आघाडीच्या १४ जागा झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT