Accident News esakal
नाशिक

Accident News: 'समृद्धी'वर अपघातांची मालिका सुरूच; टायर फुटल्याने इनोव्हा कार उलटली

सकाळ डिजिटल टीम

सिन्नर: समृद्धीच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्यातील महामार्गावर वाहनांना दररोज अपघात होत आहेत. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचे टायर फुटून कार रस्त्याच्या कडेला उलटली.

या अपघातात चौघेजण किरकोळ जखमी झाले असले तरी इनोव्हा कार पलट्या खात विरुद्ध बाजूच्या मार्गिकेवर जाऊन पडली. सुदैवाने तिकडून एखादे वाहन जात नसल्याने अनर्थ टळाला.

वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ५६४ वर हा अपघात झाला. शिर्डीहून मुंबईकडे जाणारी इनोव्हा (एमएच ०३, ए आर ३८८८) चे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडरवर आदळून थेट विरुद्ध बाजूने जाणाऱ्या लेनवर जाऊन पलटी झाली.

यात चालक सुरेश सपकाळ, जय शाह, मनिथा शाह, नयना शाह हे किरकोळ जखमी झाले. त्यांना समृद्धी महामार्गावरील मदत पथकाने रुग्णवाहिकेतून सिन्नरला नेले.

महामार्ग पोलिस उपनिरीक्षक सुनील गायकवाड, पोलिस हवालदार धकाते, हेमंत मोरे, हरीश पवार, राहुल पगारे, समाधान शिंदे, मनोज कोटकर, मनोज साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

वेगामुळे थेट विरुद्ध मार्गिकेवर

दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील प्रवाशांची कार टायर फुटून अपघातग्रस्त झाली होती. त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. भरधाव असणारी ही कार देखील थेट विरुद्ध मार्गिकवर जाऊन पडली होती.

समृद्धीवर वाहनांचा वेग सुसाट असल्याने व ती आतल्या लेनमधून धावत असल्याने अपघातग्रस्त झाल्यावर थेट विरुद्ध बाजूच्या मार्गिकेवर जातात. भविष्यात अशा प्रकारच्या अपघातांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT