Restriction Board esakal
नाशिक

Nashik : सांदण व्हॅली पर्यटकांसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नगर- नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील कळसूबाई- हरिश्‍चंद्र गड अभयारण्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक धबधबे यांसह सांदण व्हॅलीचा परिसर हा पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय वन्यजीव विभागातर्फे घेण्यात आला आहे. या ठिकाणावर लक्ष्य ठेवण्यासाठी बंदोबस्तदेखील ठेवला आहे. (Sandan Valley closed to tourists Nashik News)

मागील काही दिवसांपासून भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या संपूर्ण राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली असल्याने पर्यटकांना वर्षा पर्यटनाचे वेध लागले आहे. या भागात कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्र गड, पांजरे फॉल, अमृतेश्‍वर मंदिर, वसुंधरा फॉल, उंबरदरा, पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली होती. या सर्वांमध्ये आकर्षणाची खास बाब असलेली व आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये समावेश असलेल्या सांदण व्हॅली पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. परंतु, पावसाचा जोर व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कळसूबाई- हरिश्चंद्र गड अभयारण्यातील सांदण व्हॅली, कोकणकडा, धोकादायक असलेले पांढरे शुभ्र धबधबे या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासाठी वनविभागाकडून आवश्‍यक ती सर्व प्रकारची खबरदारी देखील घेण्यात आली आहे. दरम्यान, हौशी पर्यटकांना रोखण्यासाठी व्हॅलीमध्ये वन्यजीव विभागाकडून ठिकठिकाणी फलक लावले गेले असून, सांदण व्हॅलीत उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या ठिकाणी कुणीही प्रवेश करू नये म्हणून वनकर्मचारीदेखील तैनात केले आहे.

"कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांदण व्हॅली पर्यटनासाठी बंद केली आहे. तसेच, काही धोकादायक धबधबे या ठिकाणी वनविभागातर्फे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यटकांवर नजर ठेवली जाणार आहे. पर्यटकांनीही पर्यटनस्थळी जास्त गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचा भंग झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल." - गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : जमीन व्यवहारात माझा संंबंध नाही, प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलंय- मुरलीधर मोहोळ

IND vs AUS 1st ODI Live: १० मिनिटांच्या पावासनं १ षटक कमी झालं... आता तर एक तास झाला पाऊस पडतोय; जाणून घ्या किती षटकांची मॅच होणार

Diwali 2025: दिवाळीत दमा अन् सीओपीडीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा एका क्लिकवर

Parental Welfare Law : आई-वडिलांना वाईट वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, पगारही कापला जाणार अन्...

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT