Sangeet Devbabhali Latest Marathi News esakal
नाशिक

Nashik : मुंबई विद्यापीठ ‘BA’च्‍या अभ्यासक्रमात ‘संगीत देवबाभळी’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भद्रकाली प्रॅाडक्शनचे मराठी व्यावसायिक रंगभूमी (Marathi Commercial Theatre) गाजवणारे प्राजक्त देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अभ्यासक्रमात समावेश केला आहे. बी.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात प्रथम वर्षासाठी हे पुस्तक २०२२ पासून अभ्यासक्रमाला असेल. (Sangeet Devbabhli in BA course of Mumbai University Nashik Latest Marathi News)

पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राजक्त देशमुख यांच्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला अनेक महत्त्वाचे ४२ हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नुकताच युवा साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही या संहितेचा सन्मान झाला आहे.

भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकोबांना भाकरी द्यायला गेलेली नि काटा रुतून बेशुद्ध झालेली आवली आणि तिला लखूबाई बनून घरी घेऊन येणारी साक्षात रखूमाई यांच्यातील अनोख्या संवादातून लौकिक-अलौकिक नात्याची अद्भुत वीण प्राजक्त देशमुख यांनी नाटकातून गुंफली आहे.

देवत्व लाभलेल्या लखूबाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी हा नाटकाचा केंद्रबिंदू आहे. हे नाटक आता महाविद्यालयीन अभ्यासक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे.

देवरूख येथील शिक्षणप्रसारक मंडळाने यापूर्वीच ‘संगीत देवबाभळी’ नाटक अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. विजया मेहता, (स्व.) जयंत पवार, डॉ. राजीव नाईक, सतीश आळेकर, नसिरुद्दीन शाह, परेश रावल, दिलीप प्रभावळकर आणि अशा रंगभूमीवरच्या दिग्‍गजांनी या नाटकाचे कौतुक केले आहे.

राज्य पुरस्कार ते साहित्य अकादमी या प्रवासानंतर महत्त्वाच्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात संहिता आल्याने पुन्हा एकदा नाटकाचे साहित्यमूल्य अधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT