Dada Bhuse esakal
नाशिक

Nashik News : स्वच्छता ठेकेदार वाटरग्रेसला पालकमंत्र्यांचा दणका! मनपा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील कचरा संकलन व स्वच्छता ठेकेदार वॉटरग्रेस कंपनीला पालकमंत्री दादा भुसे यांनी दणका दिला आहे. सोमवारी (ता.२०) कचरा मोजणीत मोजमाप तफावत केल्याचा प्रकार कचरा डेपो व वजनकाट्याची पडताळणी करीत पालकमंत्री यांनी उघडकीस आणला.

त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याची गंभीर दखल घेत महापालिका स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रथमच तक्रार देत त्यांचा भडका उडविला आहे. मनपा अधिकाऱ्यांविरुद्ध घनकचरा व्यवस्थापनात निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील कचरा संकलन ठेकेदार कचरा गोळा केल्यानंतर घंटागाड्या डेपोवर नेण्यापूर्वी वजनकाट्यावर तफावत करून अतिरिक्त वजन दर्शवीत होता. तत्कालीन नगरसेवकांनीही असे प्रकार वेळोवेळी उघडकीस आणले होते.

काही नगरसेवकांनी वजन वाढविण्यासाठी कचरागाडीत दगड, धोंडे टाकले जातात असा आरोप करीत वाहने देखील रंगहाथ पकडले होते. तथापि यानंतर दंडात्मक कारवाई वगळता ठोस कारवाई झालेली नव्हती.

श्री. भुसे यांनी म्हाळदे शिवारातील कचरा डेपोला भेट दिली. त्यावेळी नागरिकांनी प्रदूषणाच्या तक्रारी केल्या. श्री. भुसे यांनी डेपोकडे कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांची चौकशी केली असता त्यांच्याकडे पावत्या नव्हत्या. अशा वाहनांचे पुन्हा वजन केले असता वजनात तफावत आढळली. ठेकेदार सावळा गोंधळ करून लूट करीत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

श्री. भुसे यांच्या दणक्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी नितीन चौधरी (वय ३७) यांनी पवारवाडी पोलिस ठाण्यात मनपाचे उपायुक्त व सहाय्यक आयुक्त स्वच्छता यांच्याविरुध्द घनकचरा व्यवस्थापन विभागाची कायदेशीर जबाबदारी पूर्ण केली नाही.

म्हाळदे शिवारातील कचऱ्यामुळे तसेच परिसरात लागलेल्या आग व धुरामुळे नजीकच्या रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होऊन संसर्ग व आजार पसरण्याची शक्यता व्यक्त करीत गुन्हा दाखल केला. पवारवाडी पोलिसांनी स्वच्छता उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT