nmc esakal
नाशिक

NMC News : नाश्त्याच्या पाकिटांचे वाटप अन्‌ लागलीच स्वच्छता; महापालिकेच्या स्वच्छता विभागाने घेतली विशेष काळजी

छत्रपती संभाजीनगर रोडवरील रोड शो आणि साधूग्राममधील जाहीर सभेसाठी लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : छत्रपती संभाजीनगर रोडवरील रोड शो आणि साधूग्राममधील जाहीर सभेसाठी लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती. काहीजण तर पहाटेपासूनच रोड शोमध्ये त्यांचा परफॉर्मन्स करण्यासाठी, तर काही महाविद्यालयीन-शालेय विद्यार्थीही आलेले होते.

या साऱ्यांसाठी नाश्त्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. (sanitation department of municipal corporation took special care during modi visit in nashik news)

तसेच, त्या नाश्त्यासाठी वापरण्यात आलेल्या पाकिटांमुळे कचरा होण्याची शक्यता गृहित धरून महापालिकेच्या सफाई कामगारांकडून तत्काळ स्वच्छताही केली जात होती. त्याचप्रमाणे, तपोवन रस्त्यावरही फुलांच्या माळांमुळे जागोजागी पडलेली फुले व कचराही स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जात होती. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाचे, वॉटरग्रेसचे सफाई कर्मचारी झटताना दिसत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो आणि कार्यक्रमस्थळी कलाकारी सादर करण्यासाठी शहरातून नव्हे तर युवा महोत्सवात परराज्यातील विविध युवक-युवती सहभागी झालेले होते. आपापल्या प्रांताची, संस्कृतीची वेशभूषा सादर करीत या कलावंत युवक-युवतींनी आपली कला सादर केली. शहरातीलही विविध शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थीही आलेले होते.

या साऱ्यांसाठी सिटी लिंक बसच्या पार्किंगमध्ये नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे, सर्वसामान्यांही नाश्त्याचे पाकिट दिले जात होते. सुमारे एक लाखांपेक्षा जास्त पाकिटांची व्यवस्था करण्यात आलेली होती. या पाकिटामध्ये एक बिस्कीट पुडा, एक वेफर्सचे पाकिट, दोन सोनपापडी असे पदार्थ होते.

तहसीलदार परमेश्वर कासुळे, बागलाणचे कैलास चावडे, देवळाचे विजय सूर्यवंशी, पुरवठा निरीक्षक विजय खरे, मंडळ अधिकारी कल्पेश गायकवाड, संजय साळी, तलाठी अरुण फसाळे, दीपक मोठे, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर नरोटे, योगेश करपे, रजनीकांत पाठक, महसूल सहाय्यक समाधान पाटील, आनंद लगरे, योगेश गोसावी यांनी सदरची जबाबदारी पार पाडली.

साफसफाई कर्मचाऱ्यांची तत्परता

सिटी लिंक बसच्या पार्किंगमध्ये नाश्त्याचे पाकिट दिल्यानंतर संबंधितांना त्याचठिकाणी ते खाऊन संपविण्याचा आग्रह केला जात होता. ठिकठिकाणी कचरा डस्बीन ठेवण्यात आलेले होते. तरीही त्याठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा तातडीने मनपा व वॉटरग्रेसच्या साफसफाई कर्मचाऱ्यांकडून संकलित करून घंटागाडीमध्ये टाकला जात होता.

त्याचप्रमाणे, तपोवन रोडवरही झाडांवर टाकलेल्या फुलांच्या माळा खाली पडून कचरा होत होता. तर पादचारी रस्त्यालगतही काही विक्रेत्यांकडून नाश्ता दिला जात होता. त्यामुळेही फुटपाथवर कचरा होता होता. तो संकलित करण्यासाठी वॉटरग्रेसचे साफसफाई कर्मचारी झटत होते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी साफसफाई कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT