sanjay Raut allegations of childish irresponsible Laxman Savaji criticism on Salim Kutta dance case nashik esakal
नाशिक

Salim Kutta Dance Case: राऊतांचे आरोप पोरकट, बेजबाबदारपणाचे; सलिम कुत्ता डान्सप्रकरणी लक्ष्मण सावजी यांची टीका

राऊत हे लुट करण्यासाठीच नाशिकमध्ये येत असतात, असा गंभीर आरोपही केला...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : २०१६ मधील ज्या डान्सपार्टीची एसआयटी व पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे, त्याप्रकरणात संबंधितांना बेड्या पडणार आहेत.

परंतु तरीही त्या पक्षाचे महान प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केलेले आरोप पोरकट आणि बेजबाबदारपणाचे आहेत.

गरज नसताना भाजपाचा त्या डान्सपार्टीशी संबंध जोडला जात असून, पक्षाबददल गैरसमज पसरविण्याचा केविलवाणा प्रयत्न राऊत करीत असल्याची टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी केली.

तसेच, राऊत हे लुट करण्यासाठीच नाशिकमध्ये येत असतात असा गंभीर आरोपही केला. (sanjay Raut allegations of childish irresponsible Laxman Savaji criticism on Salim Kutta dance case nashik crime political)

शहरातील भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण सावजी बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, भाजप कामागार आघाडीचे शहराध्यक्ष हेमंत नेहते, प्रवक्ते गोविंद बोरसे उपस्थित होते.

सावजी म्हणाले, भारतीय जनता पार्टी ही संस्कारित पार्टी आहे. पार्टीचे १८ आघाड्या व ७ मोर्चे आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरावरून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पक्ष पोहोचण्याचे काम या माध्यमातून केले जाते.

परंतु, मूळ विषय बाजुला सारून राऊत हे नाशिकला नेहमीच बदनाम करीत आले आहेत. ती पार्टी भाजपाने आयोजित केल्याचे धादांत खोटा आरोप भाजपाला बदनाम करण्यासाठी खा. राऊत करीत आहेत.

उलटपक्षी त्यांनी विकृत आणि देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याऐवजी त्यांच्या समर्थनार्थ भाजपावर टीका करीत आहेत.

व्यंकटेश मोरे भाजपाचा कार्यकर्ता असला तरी, त्याचीही चौकशी पोलिस करीत आहेत. त्यातून जे निष्पन्न होईल ते लवकरच जगजाहिर होईल असेही सावजी म्हणाले.

पॅरोल कोण देतं?

बॉम्बस्फोटातील आरोपीला तत्कालीन गृहमंत्र्यांनी पॅरोल कसा दिला, त्याचीही चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली होती.

त्यावर बोलताना भाजपाचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी टीका करताना, त्यांना रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन तथ्यहीन आरोप करण्याची सवय जडली आहे. गृहमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप करून चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीकाही केली.

नाशिकची लुट करणारा माणूस

संजय राऊत हे जेव्हाही नाशिकला येतात ते लुट करण्यासाठीच येतात. नाशिककरांवर त्यांनी अक्षरश: दरोडा टाकलेला असल्याचा गंभीर आरोपही लक्ष्मण सावजी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT