Sanjay Raut in press conference in Nashik esakal
नाशिक

शिवसेना ताब्यात घेण्याचा भाजपचा डाव : संजय राउत

विनोद बेदरकर

नाशिक : राज्यातील शिवसैनिकांना परस्परांशी लढवून शिवसेना ताब्‍यात घेण्याचा भारतीय जनता पक्षाचा (BJP) डाव आहे. परस्परांना लढविण्याचा हा डाव आहे. हिंमत असेल तर शिवसेनेचा आणि शिवसेनेच्या चिन्हाचा त्याग करुन लढून दाखवावे असे आव्हान शिवसेनेचे नेते संजय राउत (Sanjay Raut) यांनी दिले. (Sanjay Raut allegations on bjp Maharashtra political Nashik News)

दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राउत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. उद्या त्यांच्या उपस्थितीत नाशिक रोडला शिवसेनेचा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. संर्पकप्रमुख भाउसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्‍यासह शहर-जिल्ह्यातील पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. खासदार राउत म्हणाले की, शिवसेना शहरातील असो की, जिल्हातील ती जागेवरच आहे. काही लोक गेले असले तरी त्यांच्यासोबत शिवसेना गेलेली नाही. मालेगाव नांदगाव मतदार संघातील शिवसैनिक पदाधिकारी मला परत भेटत आहे.

शिवसेनेत नवीन लोक येत आहेत. नाशिक शहर जिल्हा कायम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिशी ठाम आहेत. महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता येईल. महाराष्ट्रात जो धुराळा उडाला आहे. मात्र त्यावर पाउस पडला आहे. शिवसेना नव्या जोमाने शहरातील सगळे नगरसेवक माझ्यासोबत आहेत. शहर आणि ग्रामीणच्या बैठका सुरु आहेत. शिवसेना जागच्या जागी आहे. भाजपने माझ्यावर बोलण थांबवल आहे. कारण त्यांना नवीन ४० भोंगे मिळाले आहे,धनुष्य हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेकडेच राहणार असाही दावा केला. शिवसैनिकांना लढवायचा डाव राउत म्हणाले की, शिवसेनेतून फुटलेल्या प्रत्येकाकडून वेगवेगळे कारण सांगितले जाते. काहीच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेने हिंदुत्व सोडले.

काहीच म्हणण आहे. राष्ट्रवादी कडून अडवणूक होते तर काही जण काम होत नसल्याचे सांगतात. प्रत्येक जण वेगवेगळे कारण सांगत आहे. पण खर कारण एकच आहे. भाजपला शिवसेना फोडायची आहे. शिवसेना संपल्याशिवाय त्यांना सत्ता मिळणार नाही. भाजपला शिवसेनेवर कब्जा करायचा आहे. त्यामुळे शिवसेना सोडणाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

सरकार बेकायदेशीर

राज्यातील सध्याचे सरकार बेकायदेशीर आहे. आमदार अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतांना राज्यपालांनी परस्पर भूमिका घेत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेत राज्यात बेकायदेशीर सरकार स्थापन केले आहे. सत्तेसाठी भाजपसोबत गेलेले आमदार म्हणतात की, शिवसेना आमची आहे, मातोश्री आमची आहे. चिन्ह आमचे, पक्ष आमचा अस सगळ सुरु आहे. तुमच्याच धमक असेल तर तुम्ही तुमचे चिन्ह पक्ष निर्माण करा ना असे आव्हान राउत यांनी बंडखोरांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT