Sanjay Raut  esakal
नाशिक

Sanjay Raut on Shinde Group | माझा नाशिक दौरा पाहून करतात प्रवेशाचे नियोजन; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक ही पवित्र जागा असली तरी हल्ली नाशिकमध्ये टोकन देण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रेट कार्डनुसार घाऊक प्रवेश होत आहेत. प्रथम ऑर्डर दिली जाते, व्यापारात जसे टोकन दिले जाते तसे राजकारणात काही लोकांना टोकन दिले जाते.

मग आमच्या नाशिक दौऱ्याचा मुहूर्त बघून प्रवेश सोहळे होतात, अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नाव न घेता केली. (Sanjay Raut criticism on Shinde Group on nashik daura political news)

खासदार राऊत नाशिकचा दौरा आटोपून मुंबईकडे परतताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नाशिकमध्ये कमळच फुलणार असा नारा दिला गेला; परंतु नाशिकमध्ये भगवाच फडकणार व आम्ही फडकवून दाखवू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर जिवापाड प्रेम होते.

मात्र आता गिरीश महाजन यांच्यासारख्यांनी नाशिकची जी परिस्थिती केली, त्यामुळे नाशिककरांना वीट आला आहे. नाशिक ही पवित्र जागा आहे. येथे रामतीर्थामध्ये पापक्षालन केले जाते, पण आम्ही या भाजपला देखील इथेच बुडवू.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला अटक करण्याचे कारस्थान रचल्याचे सांगत आहेत. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशझोतात यायचं होतं; परंतु त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभ्य व सुसंस्कृत होते. त्यामुळे ही संधी फडणवीसांना मिळाली नाही.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

शिवनेरीवर या, पण...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद लाभणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे त्यांनी शेवटपर्यंत समर्थन केले आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील मंजूर केला.

महाराष्ट्रातला समाज त्यांना पाठिंबा देईल असे वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. शिवनेरीवर जरूर जावे व छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीत जन्मले त्या मातीतून जर काही पवित्र गोष्टी घेता आल्या तर त्या घेऊन जा, असा सल्लाही दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT