Varkari devotees and Vaishnavas taking darshan of Srimukha in front of Vitthala temple in Bhuvaikunth which is the home of Vaishnavas.  esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palkhi : जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता..! 17 दिवसांचा परतीचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा

Sant Nivruttinath Palkhi : आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया

भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद.

धन्य झालो, आम्ही जन्माचे नाम घेऊ तुझ्या आवडीचे,

हा तुकाराम महाराजांचा अभंग गात परतीचा प्रवास वारकऱ्यांनी विठुरायाची मूर्ती डोळ्यात साठवत सुरू केला आहे. (sant nivruttinath palakhi leave pandharpur on 3 july nashik news)

सकल वैष्णवांचे माहेर असलेल्या पंढरपूर नगरीतून पुन्हा माघारी जाताना वारकऱ्यांचे हृदय दाटून येत जड अंतःकरणाने पांडुरंगाला निरोप देताना अनेकांच्या भावनांचा बांध फुटत होता.

पौर्णिमेला होणाऱ्या काल्याच्या कीर्तनानंतर काल्याची लाही घेऊनच निष्ठावंत वारकरी परतीला निघतो. १ जुलैला शनिवारी बहुतेक पालख्या माघारी गेल्या. परंतु संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी पुनवेची लाही घेतल्याखेरीज माघारी जात नसल्याची परंपरा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार ३ जुलैला पालखी निघणार असून, सतरा दिवसांचा परतीचा प्रवास करून २० जुलैला पालखी त्र्यंबकेश्वर नगरीत पोचणार आहे.

"नगरप्रदक्षिणेनंतर १ जुलैला शनिवारी बहुतेक पालख्या माघारी गेल्या. परंतु संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी पुनवेची लाही घेतल्याखेरीज माघारी जात नसल्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार पौर्णिमेला काल्याच्या प्रसादानंतर ३ जुलैला पालखीचे प्रस्थान होणार आहे.

सतरा दिवसांचा परतीचा प्रवास करून २० जुलैला पालखी त्र्यंबकेश्वर नगरीत पोचणार आहे. सर्व वारकऱ्यांच्या तसेच विश्वस्तांच्या सहकार्याने आषाढी पायीदिंडी सोहळा निर्विघ्नपणे पार पडला आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे सर्व वैष्णवांचे आभार मानतो." - नीलेश गाढवे पाटील, अध्यक्ष, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT