आदिमायेच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासचा प्रशासनाचा घाट sakal news
नाशिक

आदिमायेच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासचा प्रशासनाचा घाट

यात्रोत्सव रद्द; प्रशासकीय विभागप्रमुखांची आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा

वणी : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वयंभू आदिशक्ती सप्तशृंगीचा शारदीय नवरात्रोत्सव व कावड उत्सव एका वर्षाच्या खंडानंतर भाविकांच्या उपस्थितीत ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र या निमित्ताने गडावर भरणारी यात्रा प्रशासनाने रद्द केली असून, भाविकांना दर्शनासाठी कोविडच्या अटी-शर्तीनुसार ऑनलाइन पास काढवा लागणार आहे. दरम्यान, भाविकांची सुरक्षितता, आरोग्य व वाहतूक यांच्यावर प्रशासनाकडून विशेष प्राधान्य दिले जाणार असून, याबाबत गुरुवारी (ता. ३०) उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास मीणा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली.

गडावर ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव तर १९ व २० ऑक्टोबरदरम्यान कोजागरी पौर्णिमा उत्सव होत आहे. नवत्रोत्सवाच्या तयारीसंदर्भात गुरुवारी सप्तश्रृंगगड येथे आढावा बैठक झाली. दर्शनासाठी ऑनलाइन पासची अट व पाससाठी कोविड प्रतिबंधात्मक दोन डोसची किंवा ७२ तासांपर्यंत कोविड रॅपिड टेस्ट केल्याचे सर्टिफिकेट प्रशासनाने अनिर्वाय असल्याचा निर्णय घेतल्याने भाविकांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले असून, भाविकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आढावा बैठकीस कावड यात्रेसंदर्भात प्रशासनाने निर्णय घेतलेला नसून याबाबत नियोजन करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती श्री. मीणा यांनी दिली. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी, सप्तशृंगी देवी ट्रस्टचे विश्वस्त मनज्योत पाटील, ॲड ललीत निकम, भूषणराज

तळेकर, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार, सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय दुबे, न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदींसह प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.आरोग्य यंत्रणेने गडावरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ट्रस्ट दवाखाना, रामटप्पा आदी ठिकाणांबरोबरच बसस्थानक पाय रस्ता या ठिकाणी भाविकांसाठी उपचार केंद्र उभारण्याच्या सूचना देत दहा रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कळवणचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनंत पवारयांनी दिली.

पिण्याच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नांदुरी- सप्तशृंगगड घाटरस्तावरील साइडपट्ट्या व खड्डयांची डागडुजी करून रस्त्यावर जेसीबी व क्रेन तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. परिवहन महामंडळाने भाविक प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी नवीन गाड्या वापराव्यात तसेच नांदुरी व गडावरील बसस्थानकाच्या वाहनतळावर नियंत्रण कक्ष, फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना विभागीय वाहतूक नियत्रंकांना करण्यात आली आहे.

काय घेतले निर्णय...

  • भाविकांना २४ तास दर्शन

  • तासाला एक हजार २०० भाविकांना दर्शन.

  • पाच वर्षांखालील बालके व ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिंकांना मंदिरप्रवेश बंद.

  • फॅनिक्युलरद्वारे तासाला ४०० भाविकांची मंदिरापर्यंत ने-आण.

  • बाहेरील व्यावसायिकांना गडावर दुकाने थाटण्यास बंदी.

  • नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता नवरात्रोत्सवात खासगी वाहतुकीस बंद.

  • शिवालय तलावात स्नानासाठी बंदी.

  • सप्तशृंगगड ग्रामस्थांना गडावर ये-जासाठी आधारकार्डची सक्ती.

  • मंदिर व परिसरात तासाच्या अंतराने सॅनिटायझिंग.

  • मंदिर परिसरात बोकडबळी बंदी कायम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT