Crowds gathered near the first step as palanquins and pilgrims entered. esakal
नाशिक

Nashik News: सप्तशृंग गड अन्‌ वणी-शिर्डी रस्ता साईमय! गुजरातमधील भाविकांमध्ये तरुणांसह महिला अधिक

सकाळ वृत्तसेवा

वणी : ‘साई बाबा की जय’चा जयघोष साई राम-साई रामची मंत्रधूनने वणी-सप्तश्रृंग गड दुमदमला होता. गुजरातमधील साईभक्तांची पावले आदिमाया सप्तशृंगदेवीचे दर्शन घेऊन त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवासाठी शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहेत.

दरम्यान, वणी परिसर साईभक्तांच्या गर्दीने फुलला असून, वातावरण साईमय झाले आहे. (Saptshring Fort and Vani Shirdi Road sai baba lovers Among devotees in Gujarat more women including youth Nashik News)

दिवाळी संपताच दुसऱ्या दिवसापासून गुजरातमधील सुरत, बडोदा, वाजदा, नवसारी, बिल्लीमोरा, बलसाड, उन्हई, उधना आदी ठिकाणांहून शेकडो साई मंडळ व संस्था सप्तश्रृंगी गड व शिर्डी दर्शनासाठी साईपालखीसह प्रस्थान करतात.

प्रत्येक मंडळात शंभर ते दोनशे साईभक्त सहभागी होऊन मजल-दरमजल करत सात ते आठ दिवसानंतर सप्तश्रृंगगड व वणी परिसरात दाखल झाले आहेत. सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनानंतर वणी येथे बहुतेक मंडळे मुक्कामी राहत असल्याने वणीतील सर्व सभा मंडपे व खासगी हॉल साईभक्तांनी भरली आहेत.

साईभक्तांची गर्दी व डीजेच्या आवाजात साईंच्या भक्तिगीतात दाखल झालेल्या साई पालख्या व मूर्तींमुळे वणी व परिसर साईमय झाला आहे. पदयात्रेकरूंमध्ये तरुणांसमवेत महिला भक्तांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

साई मंडळांतर्फे भाविकांसाठी नाश्‍ता, पिण्याच्या पाणी व निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. वणीतील साई मंडळ, संताजी युवक मित्र मंडळ, जगदंबा मित्र मंडळ आदी मंडळे साईभक्तांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

येथे दाखल पालख्या व पदयात्रेकरू मुक्कामानंतर भल्या पहाटे साई आरती करून पुढील मार्गक्रमण करीत आहेत. पिंपळगाव, निफाड, सावळी विहीरमार्गे शिर्डी, असे मार्गक्रमण करत २५ व २६ नोव्हेंबरपर्यंत त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवासाठी शिर्डी येथे साईनगरीत पोचणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडे तरुणांची गर्दी; ५०० इच्छुकांच्या मुलाखती!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन हद्दीत खुनाची घटना; संशयिताच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना!

Sinhagad Fort Exhibition : सिंहगडावर शिवकालीन वैभवाचा जागर; ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन!

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

SCROLL FOR NEXT