Sarpamitra Nitin Sonawane esakal
नाशिक

Nashik News : सर्पमित्र नितीन सोनवणे यांनी पकडला दुर्मिळ Black Cobra

प्रमोद सावंत: सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहराजवळील सवंदगाव शिवारातील शेतातील खळ्यात सर्पमित्र नितीन सोनवणे यांनी मंगळवारी (ता.२०) अतिशय दुर्मिळ असलेला साडेपाच फुटी ब्लॅक कोब्रा हा विषारी नाग पकडला.

सवंदगाव शिवारातील शेतकऱ्याला सापाची कात दिसून आल्याने त्याने श्री. सोनवणे यांना दुरध्वनी केला. सोनवणे आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले.

त्यांना पुर्णत: काळ्या रंगाची कात दिसून आल्याने तेही हरखून गेले. तब्बल तासभर शोध घेतल्यानंतर वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीत त्यांना विषारी ब्लॅक कोब्रा नाग दिसून आला. (Sarpamitra Nitin Sonawane Rare Black Cobra caught Nashik News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

त्यांनी त्याला सफाईदारपणे पकडले. अन्‌ परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. साडेपाच फुटी विषारी नाग पाहून अनेक जण अचंबीत झाले.

श्री. सोनवणे म्हणाले, गेल्या चार दशकापासून मी सर्पमित्र म्हणून काम करीत आहे. आजवर असंख्य साप पकडले. मी स्वत:ही संपूर्ण काळ्या रंगाचा असा नाग आजवर पाहिला नव्हता. याच सर्पाला इंडियन स्पिटीकल कोब्रा (ब्लॅक कोब्रा) म्हणतात.

परिसरात कोंबड्या, अंडी व उंदीर असल्याने हा नाग येथे आला असावा. वनविभागात नोंद करुन त्यांच्या सल्ल्याने या नागाला श्री. सोनवणे यांनी सायंकाळी त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT