sarpanch attend meeting
sarpanch attend meeting esakal
नाशिक

प्रत्येक आई ही असते हिरकणी! 9 दिवसांच्‍या बाळासह बैठकीला हजर

राम शिंदे

सर्वतीर्थ टाकेद (जि.नाशिक) : एक ती हिरकणी होती...एक आजची हिरकणी..! आपल्या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे एक हिरकणी दडलेली आहे. ती रोज आपल्या बाळासाठी कुठला ना कुठला गड उतरत असते. किंवा रोज वेगवेगळ्या संकटावर मात करत असते. प्रत्येक आई ही हिरकणी असते. मग ती नोकरी करणारी असो किंवा गृहिणी.. आता इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील या सरपंचच पाहा...आपल्या नऊ दिवसांच्या लेकराला घेऊन ग्रामपंचायत मासिक बैठकीला उपस्थिती दर्शवून गावचा कारभारही पाहिला. सोबतच त्यांचे आईचे कर्तव्य पार पाडले. (Sarpanch-Attend--meeting-with-9-day-old-baby-nashik-marathi-news)

एक ती हिरकणी होती...एक आजची हिरकणी..!

मंगळवारी (ता.२९) ग्रामपंचायतीची मासिक बैठक अजेंडा देऊन आयोजित केली होती. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे यांनी आपल्या नऊ दिवसांच्या लहान बाळासह ग्रामपंचायत मासिक बैठकीला उपस्थिती दर्शवली.

ते माझे कर्तव्यच समजते

सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यतत्पर राहीन, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी नऊ दिवसांपूर्वी जन्म दिलेल्या मुलीसह ग्रामपंचायत मासिक बैठकीला उपस्थित राहिले व ते माझे कर्तव्यच समजते. - पुष्पा बांबळे , सरपंच, मायदरा-धानोशी.

बाळासह बैठकीला सरपंचांनी दर्शविलेली उपस्थिती ही आदर्शवत प्रेरणा देणारी आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे." - नितीन हेंबाडे, ग्रामसेवक.

गाव विकासाच्या दृष्टीने बैठक

बैठकीमध्ये सरपंच बांबळे यांनी गाव विकासाच्या दृष्टीने गावातील पाणीपुरवठा, वीजप्रश्न, दलित वस्तीतील मंजूर पथदीप विकास कामे, घरकुल योजने संदर्भात माहिती, गावातील शिवार रस्ते या प्रश्नासंदर्भात आढावा घेतला. याबद्दल ग्रामसेवक नितीन हेंबाडे, ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रभागा केवारे, सदस्य लंकाबाई बांबळे, गंगाराम करवंदे आदींसह ग्रामस्थांनी सरपंच पुष्पा बांबळे यांचे स्वागत करून अभिनंदन आभार व्यक्त केले. याप्रसंगी साहेबराव बांबळे, बहिरू केवारे, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख धोंगडे, रंगनाथ लोहकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT