reporter beat.png
reporter beat.png 
नाशिक

अमानुष! सत्य वस्तुस्थितीची बातमी दिल्याने सरपंचाचे धाबे दणाणले.. अन् रागाने केली पत्रकाराला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मनमाड : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असतानाच अनेकजण आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. त्यात डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी तसेच पत्रकारही आपलं कर्तृव्य पार पाडत आहे. प्रत्येक घटनेची वास्तव माहिती समाजापर्यंत पोहचवण्याचे काम पत्रकार करतो. देशाचे कौशल्य, सामर्थ्य व तरुण पिढीला दिशा देण्याचे काम आज फक्त पत्रकारिता करत आहे. त्यामुळे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेवरच घाला घातला जात आहे. अशातच ग्रामीण भागातील सत्य वस्तुस्थितीला धरून सटाणा (अंबासन) मधील पत्रकाराने बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. आणि त्याच रागातून पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. 

याबाबत अधिक वृत्त असे की...

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अंबासन या गावात काही दिवसांपूर्वी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. पाण्याचा मुबलक साठा असतांना देखील ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली, अशा आशयाची बातमी दै.सकाळचे पत्रकार दीपक खैरनार यांनी वृत्त पत्रात प्रसिद्ध केली होती. बातमी सत्य वस्तुस्थितीला धरून होती. मात्र, आपल्या विरोधात ही बातमी असल्याचा राग मनात धरून सरपंच जितेंद्र अहिरे व त्याच्या इतर साथीदारांनी खैरनार यांना शिवीगाळ करत जबर मारहाण केली. खैरनार असं या प्रतिनिधींचं नाव असून मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला नामपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सरपंच जितेंद्र अहिरे याला अटक केली आहे.

घेतलाी दखल.. सरपंचाला अटक

विरोधात बातमी छापली असल्याचा राग मनात धरून सरपंचाने एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला जबर मारहाण केल्याची  घटना बागलाणच्या अंबासन येथे घडली. दीपक खैरनार असं या प्रतिनिधींचं नाव असून मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला नामपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सरपंच जितेंद्र अहिरे याला अटक केली आहे.

अन्यथा संघटना तीव्र आंदोलन छेडेल

दिपक खैरनार यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ व मराठी पत्रकार परिषद जाहीर निषेध करीत असून गुन्हेगारांना कडक शासन न झाल्यास संघटना तीव्र आंदोलन छेडले जाईल - यशवंत पवार, उपाध्यक्ष,मराठी पत्रकार परिषद, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT