Villagers inspecting the stones on the Ajmer Saundane to Devalane road. esakal
नाशिक

Nashik: सटाणा- रावळगाव रस्त्याची लागली वाट; थातुरमातूर डागडुजी नको, एकदाच चांगले काम करा! ग्रामस्थ आक्रमक

- दीपक खैरनार

अंबासन : सटाणा ते रावळगाव रस्त्यावरील अजमेर सौंदाणे ते देवळाणे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

रस्त्याची डागडुजी न करता संबंधित विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, थातूरमातूर, निकृष्ट काम होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा देवळाणे, सुराणे व वायगाव येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. आमदार, खासदारांनी तरी या निकृष्टतेची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Satana Rawalgaon road waiting Aggressive villagers Nashik)

रावळगाव, सातमाने, माळीनगर, दुंधे, वायगाव, सुराणे, देवळाणे या गावांना शहराशी जोडणा-या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यातून जीन मुठीत घेत वाहनचालकांना करावा लागत आहे.

रामतीर फाट्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मशिनरी दाखल झाली, पण काम अतिशय निकृष्ट होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अजमेर सौंदाणे ते देवळाणे रस्त्यावरील खड्ड्यांबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.

रस्त्यावरील थातूरमातूर डागडुजी खपवून घेतली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला आहे. संबंधित विभागाने कायमस्वरूपी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान या रस्त्यावरील काम लवकरच पूर्ण केले जाईल अशी ग्वाही बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

"अजमेर सौंदाणे ते रातीर फाट्यावर रस्त्यावरील डागडुजी सुरू आहे, मात्र ही डागडुजी फक्त देखावा आहे. कामे निकृष्ट होत आहे. बस खड्ड्यातून धावताना बिघडतात, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. आमच्या शेतातील माल वाहतुकीलाही प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. आम्ही दाद मागावी तरी कुणाकडे?"- दीपक ठोके, माजी सरपंच सुराणे.

"रस्त्याच्या डागडुजीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत आम्ही वायगाव, सुराणे व देवळाणे ग्रामपंचायतीमार्फत बांधकाम विभागाकडे तक्रार करणार आहोत. नेहमीच दुरुस्ती व थातूरमातूर डागडुजी करून शासनाने कायमस्वरुपी रस्त्याचे चांगले काम करावे."

- अशोक आहिरे, सरपंच वायगाव.

"सटाणा रावळगाव रस्ता रहदारीचा व वर्दळीचा आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात अपघातासाठी हॉटस्पाॅट बनत चालला आहे. वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी केली जात आहे. डागडुजीच्या नावाने मशिनरी पाठविले जाते, दहा खड्डे सोडायचेत आणि कुठेतरी दुरुस्ती करायची असा प्रकार सुरू आहे. कामाची चौकशी व्हावी अशी आमची व ग्रामस्थांकडून मागणी आहे."

- नितीन देवरे, ग्रामस्थ सुराणे.

"या रस्त्याची दर दोन वर्षांनंतर डागडुजी होते. मग हा रस्ता खराबच कसा होतो. आज अशी अवस्था झाली आहे, की रस्त्यावरून कसे जावे हा प्रश्न पडतो शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. तक्रार करूनही तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जात आहे."

- सुभाष भदाण, ग्रामस्थ देवळाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Patil Death News : डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता अंतिम संस्कार; राहुल गांधी, खर्गे, डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित

Chandipura Virus : गुजरातमध्ये २२ मुलांचा मृत्यू , आधी ताप अन् मग बेशुद्ध... चंडीपुरा व्हायरसची काय आहेत लक्षणे?

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पुढचे ४ दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज; कोयना, अलमट्टीतून विसर्ग वाढला

Maharashtra Politics: ‘गूँगी गुडिया’ वादावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने; गांधी भवनात घोषणाबाजी, सुनेत्रा पवारांवरील पोस्टने पेटला वाद

Maharashtra IMA Strike: सीसीएमपी होमिओपॅथांना अलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी; नोंदणीविरोधात ११ हजार डॉक्टरांचा बेमुदत संप सुरूच

SCROLL FOR NEXT