New Building of Satpur Police Station esakal
नाशिक

Nashik News: सातपूर पोलीस ठाणे होणार नवीन इमारतीत स्थलांतर! उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून अखेर नवीन इमारतीला मंजुरी मिळाली परंतु नंतर कोरोनाचा प्रादूर्भावामुळे काम संथगतीने झाले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून सुसज्ज असलेल्या नवीन सातपूर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्या (ता. १०) लोकार्पण होते आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता उदघाटन होणार आहे. (Satpur Police Station will shift to new building Inauguration by Deputy Chief Minister tomorrow Nashik News)

गेल्या काही वर्षांपासून सातपूर पोलिस ठाणे नवीन इमारतीच्या प्रतिक्षेत होते. त्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून अखेर नवीन इमारतीला मंजुरी मिळाली परंतु नंतर कोरोनाचा प्रादूर्भावामुळे काम संथगतीने झाले.

गेल्या काही महिन्यांपासून नवीन इमारतीचे काम पूर्णत्वास गेले होते परंतु लोकार्पणाच्या प्रतिक्षेत होते. यासाठी ‘दै. सकाळ’मधून सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर नवीन इमारतीच्या लोकार्पणाला मुहूर्त लाभल्याने सातपूर पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सुसज्ज नवीन इमारत

सातपूर पोलीस ठाण्यासाठीची नवीन सुसज्ज इमारतीमध्ये आधुनिक दर्जाच्या सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अधिकारी वर्गांसाठी स्वतंत्र दालन, ठाणे अंमलदार व तक्रारदारांसाठीचे स्वतंत्र दालन आहे.

त्याचप्रमाणे, इमारत दुमजली असल्याने पोलीसांच्या कामकाजाच्या दृष्टीकोनातून विभागवार सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

पंचवटी, उपनगर, म्हसरुळ ठाणेही प्रस्तावित

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलीस ठाण्याचीही नूतन इमारत प्रस्तावित आहे. सद्यस्थितीमध्ये पंचवटी पोलीस ठाणेच्याच जागेवर नवीन प्रस्तावित इमारतीचा आराखडा तयार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेपल्याने नवीन इमारतीसाठी निधीला अद्याप मंजुरी नाही.  तर, उपनगर पोलिस ठाण्यासाठीही जागा निश्चित झाली आहे परंतु त्याबाबतचा प्रस्तावही शासनदरबारी प्रलंबित आहे.

याचप्रमाणे, म्हसरुळ पोलीस ठाणे सध्या मेरीच्या जागेत सुरू असून तीच जागा पोलीस ठाण्यासाठी निश्चित करून त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT