Satyajeet Tambe sakal
नाशिक

Satyajeet Tambe: राजस्थान अन् छत्तीसगडप्रमाणे सुशिक्षित बेरोजगारांना द्या भत्ता : सत्यजित तांबे

सकाळ वृत्तसेवा

Satyajeet Tambe : राज्यात पदवी आणि पदविका घेतलेल्या सर्व तरुणांना रोजगार देणे शक्य नाही. त्यामुळे राजस्थान, छत्तीसगडप्रमाणे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेतील पुरवणी मागण्यांच्या चर्चेवेळी केली.

सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांसाठी राज्याची तिजोरी खुली करावी, अशी मागणी करत श्री. तांबे यांनी देवमामलेदार यांचे उदाहरण दिले. (Satyajeet Tambe statement Give allowance to educated unemployed like Rajasthan and Chhattisgarh nashik)

श्री. तांबे यांनी संगमनेर पोलिस कर्मचारी वसाहतीच्या दुरवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारने या वसाहतीची पुनर्बांधणी करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.

संगमनेर-अकोले भागातील नागरिकांना वाहन पासिंगसाठी १०० किलोमीटरवरील श्रीरामपूरला जावे लागते. त्यावर उपाय म्हणून संगमनेर-अकोले विभागासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सुरू करावे, अशीही मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले, की निम्न तापी पाडसे प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी. त्याचा राष्ट्रीय प्रकल्पात समावेश करावा.

तसेच पारनेर तालुक्यातील रोकडेश्वर जलउपसा सिंचन योजना क्रमांक १ तर्फे ऊर्जानिर्मिती व एक्स्प्रेस फिडरसाठी सव्वादोन कोटींची मागणी करण्यात आली आहे. सिंचन योजनांसाठी जलसंपदा विभागाने भरीव तरतूद करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सरकारने ७२ वसतिगृहांसाठी मान्यता दिली. मात्र अद्याप एकही वसतिगृह सुरू झाले नाही. यंदा वसतिगृह उभारणे शक्य नसल्यास विद्यार्थ्यांना राहण्याचा खर्च द्यावा व वसतिगृहांसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करावा.

याशिवाय राज्यातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्राध्यापक भरतीचा निर्णय तातडीने घ्यावा. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित बिले लवकरात लवकर द्यावीत आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या वाढवावी, अशाही मागण्या श्री. तांबे यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT