Cyber crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: क्रिप्‍टो करन्‍सीत जादा परताव्‍याचे आमिष दाखवत 24 लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : क्रिप्‍टो करन्‍सीचे ट्रेडिंग करत जास्‍त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची आर्थिक फसवणूक झाली आहे.

वेळोवेळी तब्‍बल २४ लाख रुपयांचा अपहार केल्‍याप्रकरणी महिलेने आयटी ॲक्‍टनुसार संशयितावर गुन्‍हा दाखल केला आहे. (Scams 24 Lakhs with Lure of High Returns in Crypto currency Nashik Cyber Crime)

यासंदर्भात राजश्री रामराव खोरगडे (रा. ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्‍यानुसार श्रीमती खोरगडे यांनी सप्टेंबर महिन्यात इंटरनेटद्वारे घरबसल्‍या कामाचा शोध घेत असताना टेलिग्राम आयडीच्या माध्यमातून भामट्यांनी संपर्क झाला.

क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेंडिग केल्यावर जास्‍तीचा परतावा मिळेल, अशा भूलथापा देत संशयितांनी पैशांची मागणी केली. त्‍यानुसार २१ ते ३० सप्टेंबरदरम्यान श्रीमती खोरगडे यांनी २४ लाख रुपये टेलिग्राम आयडीधारकाच्या बॅंक खात्यात जमा केले.

परंतु रक्‍कम देण्यास संशयितांनी टाळाटाळ करताना अचानक संपर्क तोडला. त्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेत गुन्‍हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : आसाम रायफल्सच्या वाहनांवर सुखोवीजवळ संशयित IED स्फोट

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT