Death esakal
नाशिक

Nashik News: शाळकरी मुलाचा पतंग उडविताना मृत्यू; पाडळे गावावर शोककळा

तालुक्यातील पाडळी गावातील १३ वर्षीय शाळकरी मुलाचा पतंग उडविताना तोल गेल्याने विहिरीत पडला अन...

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यातील पाडळी गावातील १३ वर्षीय शाळकरी मुलाचा पतंग उडविताना तोल गेल्याने विहिरीत पडला.

पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. (School boy dies while flying kite Mourning at Padale village Nashik News)

पाडळी येथील आलोक संदीप रेवगडे पाडळीच्या पातळेश्वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता. गुरुवारी (ता. ४) दुपारी अडीचच्या सुमारास आलोक दोन-तीन मित्रांसमवेत पतंग उडवित होता.

आकाशात उंच भरारी घेतल्यानंतर पतंगाला आसारीतून ढील देत तो मागे सरकत होता. मात्र, मागे विहीर असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे तोल जाऊन विहिरीत पडला. सोबतच्या मित्रांनी मदतीसाठी धावाधाव केली व आरडाओरड केली.

त्यावरून नागरिकांनी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या आलोकला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, यश आले नाही. जवळपास अर्धा तासांच्या अवधीनंतर त्याचा मृतदेह हाती आला.

त्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. ग्रामस्थांनीही हळहळ व्यक्त केली. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पाडळी येथील अमरधाममध्ये सायंकाळी आलोकवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे. आलोकच्या जाण्याने पाडळी गावावर शोककळा पसरली आहे. शाळेत अतिशय हुशार असलेला आलोकचा मृत्यू झाल्याने सर्व नागरिक शोकमग्न झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT