death body.jpg 
नाशिक

ह्रदयद्रावक! सकाळी हसतमुख दिसलेल्या लेकीची दुपारी डेडबॉडीच...आईने फोडला हंबरडा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिन्नर) आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस...अन् त्याच दिवशी तिने केला असा धक्कादायक प्रकार...'बाबा येतांना आईस केक घेऊन या' असंही ती म्हणाली होती..घरातली कामे आवरुन झाल्यानंतर असं नेमकं काय आलं मनात की तिने घेतले टोकाचं पाऊल...

अशी आहे घटना

शहरातील विजयनगर परिसरातील सोनवणे मळा वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (ता. 24) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. सायली पुरुषोत्तम जाधव (वय 13) रा. सोनवणे मळा, विजय नगर, सिन्नर असे या मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विजय नगरमधील सोनवणे मळा येथे पुरुषोत्तम जाधव हे कुटूंबियांसह वास्तव्यास असून ते शहरातील कापड दुकानात कामाला आहेत. तर पत्नी माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामाला असून एक मुलगा व एक मुलगी असे चौकोनी कुटूंब असलेल्या जाधव यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच अल्पवयीन मुलीने जीवनयात्रा संपविल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

लग्नाच्या वाढदिवशीच मुलीने संपवली जीवनयात्रा...

मंगळवारी सकाळी सात वाजता सायलीची आई कंपनीत कामावर गेली तर वडील पुरुषोत्तम जाधव सकाळी साडेनऊ वाजता कापड दुकानात कामाला गेले. निघताना सायलीने वडिलांना सायंकाळी लग्नाचा वाढिदवस असल्याने 'आईस केक' आणावयासही सांगितले होते. आईवडील दोघेही कामावर गेल्यानंतर सायली घरी एकटीच होती. तीने घरातील सर्व कामे आवरुन घेत घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने शेजारी वास्तव्यास असलेल्या महिलेने नाष्ट्यासाठी केलेला पदार्थ सायलीला देण्यासाठी जाधव यांच्या घराचा लोटलेला दरवाजा उघडला असता समोर पंख्याला लटकेल्या अवस्थेत सायली दिसल्यावर तीने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी सायलीचे वडील जाधव यांना भ्रमणध्वनीवरुन घटनेची माहिती दिली. 

अवघ्या अर्ध्या तासापूर्वी अगदी उत्साहात कामाला आलेल्या वडिलांना मुलीने आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी लागलीच घरी धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने सायलीला खाली उतरुन घेत उपचारार्थ शहरातील खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तथापि, उपचारांपुर्वीच तीची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. रसेडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ यांनी घटनास्थळी जात मृतदेह शवविच्छेदना साठी नगरपालिका दवाखान्यात पाठविला. दरम्यान, सायलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

Samsung Galaxy S24 Ultra मोबाईलवर चक्क 70 हजारचा डिस्काउंट; प्रीमियम ऑफर पाहा एका क्लिकवर

Political Astrology : अजित पवारांच्या मागची साडेसाती कधी संपणार? या महिन्यात होणार मोठा राजकीय बदल, जाणून घ्या भविष्य....

Asia Cup, IND vs PAK: मोदींना शेवटची संधी होती..उद्धव ठाकरे खवळले, महिला शिवसैनिक पंतप्रधानांना सिंदूर पाठवणार!

Latest Marathi News Updates : कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT