School Nutrition Scheme News esakal
नाशिक

Sakal Exclusive : शालेय पोषण आहारचा भार प्रभारीवर!

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर (जि. नाशिक) : शिक्षण विभागातील महत्त्वाची दैनंदिन योजना म्हणून शालेय माध्यान्ह भोजन योजनेकडे बघितले जाते. सदर योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत केली जाते. या योजनेचे तालुकास्तरावरील कारभारी म्हणून शालेय पोषण आहार अधीक्षक कामकाज बघतात. यांच्या मदतीला डाटा ऑपरेटर दिलेला आहे. बहुतांश तालुक्यातील पदे रिक्त असल्याने कार्यभार प्रभारीच आहे.

ग्रामीण भागातील वस्ती, वाडी वंचित घटकांतील मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात शाळेतील जेवण महत्त्वपूर्ण ठरत असते. त्यामुळे या योजनेचे महत्त्व अधोरेखित होते. जिल्ह्यातील १३ अधीक्षक पदे मंजूर असताना ७ पदे रिक्त असल्याने या अधिकाऱ्यांना दोन- तीन तालुक्यांचे कामकाज करावे लागत आहे. (School Nutrition Superintendent Vacancies in District Maintenance at extra charge Nashik News)

माध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी, नियंत्रण, पडताळणी, राज्य शासनाच्या धोरणानुसार शाळांना मार्गदर्शन, तपासणी, आहार गुणवत्ता व दर्जा यासह धान्य व धान्यादी मालाची मागणी, त्यावर होणाऱ्या खर्चाची मंजुरी,स्वयंपाकी व मदतनीस मानधन वितरण, लेखा परिक्षण असे कामकाज पार पाडावे लागते.

अधीक्षकांना समन्वय म्हणून योजनेची कार्यवाही करण्यास जिल्ह्यात डाटा ऑपरेटर काम बघतात. मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या तालुक्यात बरेचदा ऑनलाइन, झूम मीटिंग अशा पद्धतीने शाळांमधील मुख्याध्यापक व संबंधित यंत्रणेवर संनियंत्रण करावे लागते.

राजपत्रित पद असल्याने शिक्षण व शालेय पोषण आहार अशा पदांची सुंदोपसुंदी घडत असते. अनेक तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभारही देण्यात येतो. अतिरिक्त पदभाराच्या दरम्यान तीन- तीन तालुक्यांचा प्रभार असताना माध्यान्ह भोजन भरारी पथकातही अधिक्षकांची वर्णी लावण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सात लाखावर नियमित लाभार्थी असलेल्या योजनेचा डामडौल प्रभारी असल्याने यंत्रणेची मात्र पुरती ससेहोलपट होत असते. योजना प्रभावीपणे राबविणारे शिक्षक अपडेट माहिती तालुक्याला पुरवतात.डाटा ऑपरेटर हा यंत्रणेचा कणा असल्याने ही पदे तातडीने भरण्याची गरज आहे.

दृष्टीक्षेपात माध्यान्ह भोजन योजना

जिल्ह्यातील शाळा : ४४३९

प्राथमिक- (जिल्हा परिषद) : ३४८३

खासगी प्राथमिक शाळा : ७१४

माध्यमिक : २४२

लाभार्थी इयत्ता १ ते ५ : ४१४४६४

लाभार्थी इयत्ता ५ ते ७ : २५३३१७

जिल्ह्यातील एकूण लाभार्थी : ६ लाख ६७७८१

स्वयंपाकी व मदतनीस : ८५५१

अधीक्षक मंजूर पदे : १३

कार्यरत : ७

रिक्त पदे : ६

डेटा ऑपरेटर मंजूर : १८

कार्यरत : ११

रिक्त पदे : ७

अधीक्षक कार्यरत तालुके

येवला, चांदवड, निफाड, सुरगाणा, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक

अतिरिक्त पदभार तालुके

मालेगाव, सिन्नर, बागलाण, पेठ, नांदगाव, कळवण

"माध्यान्ह भोजन योजना महत्त्वपूर्ण आहे. या यंत्रणेत अधिक्षक व डाटा ऑपरेटर महत्त्वाची पदे रिक्त आहेत. पूर्णपणे मंजूर पदे कार्यान्वित झाली तर कामकाजाची गती वाढेल."

- विजय मोरे, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार, जिल्हा परिषद, नाशिक.

"शालेय पोषण आहार योजनेचे तालुक्याचे कामकाज अधीक्षक पाहतात. रिक्त पदांमुळे अतिरिक्त तालुक्यातील कामकाजाने अनंत अडचणी येतात.पदे भरण्याची कार्यवाही अपेक्षित आहे." - श्रीधर देवरे, अधीक्षक (वर्ग २), जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT