teachers & students with their parents
teachers & students with their parents esakal
नाशिक

Nashik : शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्‍या; काहींकडून स्‍वागताची तयारी

अरूण मलाणी

नाशिक : शासकीय आदेशानुसार (Government Guidline) बुधवार (ता. १५) पासून शाळेची घंटा वाजणार असली तरी सोमवारी (ता. १३) शहर परिसरातील अनेक शाळा (Schools) विद्यार्थ्यांनी गजबजलेल्‍या होत्‍या. अशा शाळांमध्ये दोन दिवस आधीपासून अध्ययन प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्‍यान, अनेक शाळेमध्ये स्‍वच्‍छता, निर्जंतुकीकरणचे (Sanitization) काम सुरू होते. शिक्षकांना तासिकांचे वाटप करण्यासह अन्‍य प्रशासकीय नियोजनदेखील सुरू होते. (school started after 2 years of corona Nashik News)

शिक्षण विभागाने जारी केलेल्‍या सूचनेनुसार बुधवार (ता.१५) पासून शाळा विद्यार्थ्यांसाठी खुल्‍या होणार आहेत. तत्‍पूर्वी दोन दिवस शाळांनी स्‍वच्‍छता राबवावी, अशा सूचना होत्‍या. असे असले तरी अनेक शाळा सोमवारपासूनच भरल्‍या. बहुतांश इंग्रजी माध्यम शाळांचे प्रांगण विद्यार्थ्यांनी गजबजले होते. काही शाळेकडून अध्ययन प्रक्रियादेखील राबविण्यात आली. प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्‍वागत करताना प्रार्थना घेण्यात आली. यानंतर तासिका पार पडल्‍या. मराठी माध्यमाच्‍या शाळेकडून बुधवारी (ता. १५) विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागताची तयारी सुरू होती.

शालेय प्रांगण स्‍वच्‍छतेची लगबग

बहुतांश मराठी माध्यमाच्‍या शाळांमध्ये दिवसभर स्‍वच्‍छतेची लगबग बघायला मिळाली. याअंतर्गत शालेय परिसर निर्जंतुकीकरण करण्यासह वर्ग खोल्‍या व प्रांगणात स्‍वच्‍छता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागतासाठी फलकांवर शुभेच्‍छा संदेश लिहिण्यात येत होता, तर विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागतासाठी जय्यत तयारी शाळेकडून सुरू होती. कोरोना महामारीच्‍या पार्श्वभूमीवर शाळेला सुरवात होत असल्‍याने जनजागृतीवर आधारित संदेश फलकांवर लिहिण्यात येत होता. तसेच, विद्यार्थ्यांच्‍या तपासणीसाठी थर्मल स्‍कॅनर, तसेच सॅनिटायझरसह स्टॅन्डची व्‍यवस्‍थादेखील करण्याचे काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Gautam Gambhir: हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या डिविलियर्सवर भडकला गंभीर; म्हणाला, 'त्यांच्या कारकि‍र्दीत...'

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

IPL 2024 DC vs LSG Live Score: लखनौ - दिल्लीमध्ये अटीतटीचा सामना! केएल राहुलने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT