school students.jpg
school students.jpg 
नाशिक

प्रजासत्ताक दिनानंतर शाळांमध्ये किलबिलाट! शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक 

विक्रांत मते

नाशिक : कोरोना परिस्थितीत हळुवारपणे सुधारणा होत असल्याने आता उच्च माध्यमिकपाठोपाठ शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असून, त्यासाठी २७ जानेवारीचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. शहरात एक लाख, दहा हजार, ७७३ विद्यार्थी व दोन हजार ६०२ शिक्षकांनी गजबजणाऱ्या शाळांमध्ये कोरोनासंदर्भात नियम घालून दिले असून, शाळेत प्रवेश करण्यापूर्वी दोन हजार २४९ शिक्षक, क्लार्क व शिपाई यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. 

शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक 
मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाले. ऑक्टोबरनंतर कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सध्या सुरू आहेत. दिवसाआड विद्यार्थ्यांचे वर्ग भरत असून, त्याच धर्तीवर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार आहेत. गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक राहणार आहे. शाळांमध्ये मुलाला पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्‍यक आहे. एकदाच विनंती अर्ज भरून घेतली जाणार आहे. सॅनिटायझर, मास्क शाळांमध्ये बंधनकारक राहणार आहे. एका विद्यार्थ्याला आठवड्यातून अंदाजे तीनदा वर्गांना हजर राहावे लागणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक मिळून २०६, तर खासगी शाळांमध्ये दोन हजार २४९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक राहणार असून, त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच
 
महापालिकेच्या शाळा- १०२ 
खासगी शाळा- ३०३ 
एकूण शाळा- ४०५ 

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी 
महापालिका शाळा- १५,४७६ 
खासगी शाळांचे विद्यार्थी- ९५,२९७ 
एकूण- १,१०,७७३ 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

शिक्षकांची संख्या 
महापालिका- ४७५ 
खासगी शाळा- २,१२७ 
एकूण- २,६०२ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT