death esakal
नाशिक

चालत्या रिक्षातून घाबरून तिने उडी मारली अन् जागीच प्राण गमावले

चालत्या रिक्षातून घाबरून तिने उडी मारली अन् जागीच प्राण गमावले

सकाळ वृत्तसेवा

डुबेरे (जि. नाशिक) : सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर आटकवडे शिवारात चालत्या रिक्षातून घाबरून उडी मारल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १) सकाळी घडली.

डुबेरे येथील जनता विद्यालयात नुकतीच दहावीत गेलेली गायत्री अशोक चकणे (१४, रा. वडगाव पिंगळा, हल्ली मुक्काम आटकवडे) व पाचवीची विद्यार्थिनी सायली भगवान आव्हाड (११, रा. आटकवडे) सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यासाठी व गुणपत्रिका घेण्यासाठी शाळेत गेल्या होत्या. गुणपत्रिका घेऊन घरी परतत असताना डुबेरे येथून सिन्नरकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या समीर अहमद शेख यांच्या ॲपे रिक्षाला हात देऊन त्या रिक्षात बसल्या. रिक्षा आटकवडे शिवारात आली असता रिक्षाचालकाला या मुलींना तेथे उतरून देण्याचे लक्षात न राहिल्याने तो सरळ रिक्षा चालवू लागला. पाठीमागे बसलेल्या मुलींनी जोरजोरात सांगून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समीरला आवाज ऐकू आला नाही. मुलींचा आरडाओरडा पाहून काही वाहनधारकांनीही त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भरधाव होता. रिक्षा न थांबल्याने दोन्ही मुली घाबरल्या. या वेळी गायत्रीने चालत्या रिक्षातून उडी घेतली. तीला बघून सायलीनेही उडी घेतली.

रिक्षा जोरात असल्याने गायत्रीने उडी मारल्याने डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर सायलीच्या डोक्याला व हाताला मार लागून ती गंभीर जखमी झाली. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी रिक्षाचालकाला थांबवल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. स्थानिकांनी सिन्नरमधील श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिकाचालक गणेश काकड यांना कळवल्यावर त्या मुलींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. गायत्रीला तपासून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सायलीवर उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षण विजय माळी, एएसआय सारूकते व चेतन मोरे यांनी पंचनामा केला. जखमी सायलीच्या जबाबावरून रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आले. रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.

वडील नसल्याने मामाने केला सांभाळ

गायत्री वडगाव पिंगळा येथील असून, काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तेव्हापासून गायत्रीचा आटकवडे येथील मामाने सांभाळ केला होता. लहानपणापासून ती मामाकडेच राहत असल्याने डुबेरे येथील जनता विद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी तिचा नववीचा निकाल होता. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन दहावीत गेली होती. तिच्या मृत्यूने आटकवडे परिसरासह वडगाव पिंगळा येथे शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT