Principal S.D.Dhondge, Sahadhan Sonwane and students showing the flower garden of the primary school here. esakal
नाशिक

Nashik News : परसबागांमधून शाळा मिळवतात ताजा भाजीपाला! जिल्ह्यातील अनेक शाळांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : परसबाग घराचे आरोग्य राखते. त्याच धर्तीवर प्रत्येक शाळेत एक परसबाग असावी जेणेकरून त्यातून उत्पादित होणाऱ्या भाजीपालाचा उपयोग शालेय पोषण आहारात करता येऊ शकतो.

हाच उद्देश समोर ठेवून जिल्ह्यातील अनेक शाळांनी हा परसबाग उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. यातून विद्यार्थ्यांना ताजा भाजीपाला मिळण्यासह शेतीचे ज्ञान, निसर्गाशी एकरुप होण्याची संधी उपलब्ध होत आहे. (Schools get fresh vegetables from backyards Participation of many schools in district Nashik News)

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक शाळांमधून परसबाग विकसित करून त्यातून उत्पादित होणारा भाजीपाला पोषण आहारात वापरला जावा अशी शासनाची अपेक्षा आहे. यातून विद्यार्थी निसर्ग व पर्यावरणाशी एकरूप होऊन वनस्पतिशास्त्र सोप्या पद्धतीने शिकू शकतात.

जिल्ह्यातील अनेक शाळांनी परसबागांची रचना करताना पालकांचा सहभाग घेत व विद्यार्थी-शिक्षकांनी मेहनत करत चांगल्या प्रकारच्या परसबागा फुलल्या. त्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने होण्यासाठी केंद्र व तालुकानिहाय स्पर्धा घेण्यात आली.

त्यात परसबागेची रचना, भाज्यांची लागवड व विविधता, बागेचे व्यवस्थापन, सेंद्रिय परसबाग, सिंचन पद्धत आदी बाबींची पडताळणी करत प्रत्येक तालुक्यात तीन व जिल्ह्यात तीन क्रमांक काढण्यात आले. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात इतरही शाळा हा परसबाग उपक्रम राबवत पोषणशक्ती निर्माण करतील.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शासनाने अशा उत्कृष्ट परसबागांची स्पर्धा घेतली असता देवळा तालुक्यातील डोंगरगाव, रामेश्‍वर आणि हिंदोळावस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी तालुक्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. "ज्या शाळांना मोठे मैदान किंवा शाळेच्या बाजूला थोडीफार जागेची उपलब्धता असेल तर परसबाग विकसित करावी. यातून ताजा भाजीपाला, फळे तर मिळतातच शिवाय परिसर, अभ्यास व विज्ञान असे विषय मुले सहज शिकत आहे. कृषी ज्ञानाची पायाभरणी येथे यामुळे होऊ लागली आहे." - सतीश बच्छाव, गटशिक्षणाधिकारी, देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT