Nashik market committee Sakal
नाशिक

नाशिक बाजार समितीत आता स्मार्ट हेल्मेटद्वारे स्क्रीनिंग

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : नाशिक बाजार समितीमध्ये रॅपिड ॲन्टिजेन टेस्टनंतर (rapid antegin test) आता शेतकरी, व्यापाऱ्यांसह बाजार घटकांचे स्मार्ट हेल्मेटद्वारे स्क्रीनिंगही सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा (coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी भारतीय जैन संघटना, बाजार समिती व महापालिकेच्या पुढाकाराने दिंडोरी रोड मार्केट येथे शुक्रवारी (ता. ४) दुपारी बाराला स्मार्ट हेल्मेट (smatr helmet) मास स्क्रीनिंग या तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट कामकाजाचा प्रारंभ झाला. (Screening through smart helmet has been started in Nashik market committee)

याप्रसंगी आयुक्त कैलास जाधव, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, बीजेएस मिशन झीरो प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, मनपा विभागीय अधिकारी विवेक धांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर, भूषण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी नवीन योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न बाजार समिती संचालक मंडळाकडून सातत्याने केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मास स्क्रीनिंगद्वारे शारीरिक तापमान जास्त असलेल्या संशयित नागरिकांना शोधणे, यासाठी स्मार्ट हेल्मेट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे संशयित रुग्णांवर योग्य औषधोपचार होण्यास सहाय्य करणे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून उपक्रम सुरू केल्याची माहिती सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली. मास स्क्रीनिंगकरिता उपकरणे व कर्मचारी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय जैन संघटनेचे नंदूशेठ साखला यांचे पिंगळे यांनी आभार मानले. याप्रसंगी बीजेएसचे दीपक चोपडा, अभय ब्रह्मेचा, यतीश डुंगरवाल, गोटू चोरडिया, सतीश बोरा, बाजार समिती संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, रवींद्र भोये, संदीप पाटील, सहाय्यक सचिव प्रकाश घोलप, सहा. सचिव निवृत्ती बागूल, रवींद्र तुपे, डॉ. शालोम सय्यद उपस्थित होते.

मिनिटाला दीडशे स्क्रीनिंग

स्मार्ट हेल्मेटद्वारे एका मिनिटाला सुमारे दीडशे नागरिकांचे स्क्रीनिंग केले जाते. त्यात आढळलेल्या संशयितांना बाजूला काढून त्यांची टेस्ट केली जाते. ते पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार केले जातात.

शेतकरी व बाजार घटकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नवीन योजना अंमलात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाजार समिती संचालक मंडळाकडून सातत्याने केला जात आहे. शेतकरी, बाजार घटकांनी मास स्क्रीनिंग करताना संबंधित कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. आरोग्यचक्र व अर्थचक्र एकाच वेळी आलेले असल्याने बाजार घटकांची सुरक्षिततादेखील जपण्याचा प्रयत्न बाजार समितीकडून केला जात आहे.

- देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती

(Screening through smart helmet has been started in Nashik market committee)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT