crime news esakal
नाशिक

अबब! अडीच कोटींचे गौण खनिज चोरीला; ठकबाजांवर गुन्हा दाखल

विनोद बेदरकर

नाशिक : स्टोन क्रशर साइटमधील काही लोकांना हाताशी धरून तेथील अडीच कोटी रुपयांचे गौण खनिज चोरून त्याची परस्पर विक्री करणाऱ्या पाथर्डी येथील तिघा भावांवर वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पैशांबद्दल विचारातच ठार मारण्याची धमकी

प्रल्हाद पिराजी उंबरे, रामेश्वर पिराजी उंबरे व संतोष पिराजी उंबरे (तिघे रा. पाथर्डी, नाशिक) अशी या संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणी स्टोन क्रशर व्यावसायिक गजानन बापूराव नवले (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. दाखल तक्रारीनुसार नवले यांचे आग्रा रोडवरील सारूळ शिवारात गजानन स्टोन क्रशर आहे. वरील तिघांनी २०१८ ते १८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत क्रशरमधील काही लोकांशी संगनमत करून स्वतःच्या सात ट्रक क्रशरमध्ये आणून नवले यांच्या क्रशरमधील मालाची त्यांना कुठलीही माहिती न देता चलनविनाच टॅक्स पावती न घेता व घेतलेल्या खडी, डबर, कृत्रिम रेती, बिल्डिंग मटेरिअलचे पैसे देता अंदाजे दोन कोटी ५० लाखांच्या गौण खनिजाची परस्पर बाहेरील बांधकाम व्यावसायिकांना विक्री करून मिळालेल्या पैशातून संशयितांनी एक्स्प्रेस इन हॉटेलपासून पुढे असलेल्या नवले जलसेवेजवळ प्लॉट घेऊन चार मजली इमारत बांधली. तसेच गावी जमीन, तसेच गाड्या, सोने व रोख स्वरूपात पैसा जमवले. याविषयी विचारातच ठार मारण्याची धमकी दिल्याचे नवले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT