Kausalya Pawar esakal
नाशिक

Kho-Kho Competition : कौशल्या पवारची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो -खो स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघात निवड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात तब्बल २२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकमधील कौशल्या पवार या खेळाडूची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो़ -खो स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. कौसल्या ही केटीएचएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. (Selection of Kaushalya Pawar in Pune University team for All India InterUniversity KhoKho Competition nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला खो -खो स्पर्धा पंजाब येथे १५ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूला स्थान मिळाले आहे. राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या कौशल्याला स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश दिला आहे.

कौसल्या पवार ही ‘संस्कृती’ नाशिकची खेळाडू आहे. तिला गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठ संघात निवड होणारी कौसल्या ही खो -खो प्रबोधिनीची पहिली खेळाडू ठरली आहे.

जिल्हा खो -खो असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचालित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील खो -खो प्रशिक्षण केंद्रात ती नियमित सराव करते. तिच्या यशाबद्दल जिल्हा खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, खजिनदार सुनील गायकवाड आदींनी तिचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT