Crime esakal
नाशिक

Nashik Crime : नामांकित कंपन्यांचे बनावट स्पेअरपार्ट विक्री! पोलिसांची धाडी टाकून कारवाई

कंपनीच्या तपासणी अधिकाऱ्यांनी शहरातील चार-पाच दुकानांत धाड टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नामांकित कंपन्याच्या नावे बनावट मोबाइल, पेन ड्राइव्ह, सीडी, कपडे या बाजारपेठांवर कारवाई झाल्यानंतर नामांकित कंपनीच्या नावे ट्रकचे ‘स्पेअर पार्ट’ विक्री होणारी बाजारपेठ शहरात असल्याचे गंभीर बाब समोर आली आहे.

कंपनीच्या तपासणी अधिकाऱ्यांनी शहरातील चार-पाच दुकानांत धाड टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांत संबंधित दुकान चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Selling fake spare parts of famous companies Action by police Nashik Crime)

मुंबई नाका पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे शहरातून कंपनीचे अधिकारी नाशिकमध्ये आले असून रेवननाथ विष्णू केकाण यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार द्वारका परिसरातील सेंट्रल ॲटोमोबाइलचे संशयित प्रित अंगद जसपाल सिंग (३५) यांच्यावर प्रतिलिपी अधिकार अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उपनगर येथील मनोहर मार्केटमध्येही त्यांचे स्पेअरपार्ट दुकान असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या ठिकाणी ‘लेपार्ट’ नावाने आठ बनावट ‘क्लचप्लेट’ आढळून आल्या आहेत.

त्यानुसार ६४ हजारांचा बवनाट मुद्देमाल विक्रीसाठी ठेवत विक्री करताना आढळल्याने सदरचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई नाका पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT