Bank queue
Bank queue esakal
नाशिक

व्‍यथा ज्‍येष्ठांच्‍या : बँक, पोस्‍टात रांगा... 2-4 तास थांबा...

अरूण मलाणी

नाशिक : कधी पेन्‍शनच्‍या (Pension) कामानिमित्त, तर कधी आपल्‍या आयुष्याची जमापुंजी बँकेत मुदतठेव (Term deposit) खात्‍यात ठेवल्‍याने त्‍यावरील व्‍याज (Interest) व अन्‍य कामांनिमित्त, ज्‍येष्ठ नागरिकांचे बँक, टपाल कार्यालयात (Post Office) नियमित येणे-जाणे होते; परंतु या ठिकाणी त्यांना येणारा अनुभव अत्‍यंत कटू असल्‍याचे अनेक ज्‍येष्ठ नागरिकांचे (Senior Citizens) म्‍हणणे आहे. बँक (Banks), पोस्‍टातील रांगा अन्‌ दोन-चार तास थांबा... ही परिस्‍थिती बदलावी आणि जगणे सुसह्य व्हावे, ज्‍येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबावी, अशी आर्त हाक दिली जात आहे. (senior citizens facing problems in post office Bank long queues Nashik News)

सध्या तंत्रज्ञानाच्‍या वापरामुळे बँकिंग प्रणालीत आमूलाग्र बदल झालेले आहेत; परंतु प्रत्‍येक जण हा तंत्रस्‍नेही असेलच असे नाही. त्‍यातही आर्थिक व्‍यवहार करताना विशेष साधवगिरी बाळगणे आवश्‍यक असते. असे असताना ज्‍येष्ठ नागरिकांकडून बहुतांश वेळा बँक शाखा, टपाल कार्यालयाला भेट देत व्‍यवहार केले जातात; परंतु या भेटीदरम्‍यान येणाऱ्या कटू अनुभवांनी त्रस्‍त ज्‍येष्ठ नागरिकांकडून आता हे प्रकार थांबविण्याची मागणी केली जाते आहे. बँक अधिकारी, कर्मचारी व अन्‍य ग्राहकांनी ज्‍येष्ठांच्‍या वयाचा विचार करता त्‍यांना या कामकाजादरम्‍यान सहकार्य करावे, अशी माफक अपेक्षा ज्‍येष्ठ नागरिक संघांकडून व्‍यक्‍त केली जाते आहे.

ज्‍येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्‍या

* डोअर स्‍टेप सेवेला अनेक बँकांचा प्रतिसादच नाही.

* बँक, पोस्‍टात ज्‍येष्ठ नागरिकांसाठी स्‍वतंत्र काउंटर नसते.

* अनेकदा कार्यालय कर्मचाऱ्याकडून गैरवर्तन केले जाते.

* व्‍यवहारादरम्‍यान येताना-जाताना चोरीची भीती असते.

* पेन्‍शनची रक्‍कम काढल्‍यानंतर मुले, नातू पैसे ताब्‍यात घेतात.

* मुदतठेवींवरील घटत्‍या व्‍याजदरामुळे वाढतेय गैरसोय.

* टीडीएस कापला जात असल्‍याने होतोय दुहेरी तोटा.

डाक कार्यालये स्‍थलांतरित झाल्‍याने गैरसोय वाढली

डाक विभागातही ज्‍येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. आरडी व अन्‍य विविध माध्यमांतून ज्‍येष्ठ नागरिक व्‍यवहार करतात. परंतु यापूर्वी तळमजल्‍यावर असलेली अनेक टपाल कार्यालये वरील मजल्‍यावर स्‍थलांतरित करण्यात आलेली आहेत. या कार्यालयांत जाण्यासाठी बहुतांश ठिकाणी लिफ्टदेखील नाही. यामुळे ज्‍येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढून कार्यालयापर्यंत पोचणे जिकिरीचे होते आहे. दिंडोरी रोडवरील कार्यालय जुना आडगाव नाक्‍यावर पहिल्‍या मजल्‍यावर महापालिका इमारतीत गेले आहे. पूरिया पार्क पोस्‍ट ऑफिसचे थेट रविवार कारंजावर स्‍थलांतर केले असून, येथेच अन्‍य आणखी एक डाक कार्यालयाची शाखा विलीनीकरण झालेली आहे. यापूर्वी तळमजल्यावर असलेले मेन रोड येथील डाक कार्यालय सध्या तिसऱ्या मजल्‍यावर गेले आहे. काळाराम मंदिर कार्यालय मंदिर परिसरात असणे अपेक्षित असताना ते सध्या नारोशंकराच्या मंदिरासमोरील महापालिका इमारतीत दुसऱ्या मजल्‍यावर आहे. या अडगळीच्‍या ठिकाणांवर ज्‍येष्ठ नागरिकांना पोचणे कठीण होत असल्‍याने याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्‍यकता आहे.

"टपाल कार्यालयांची वेळ सकाळी नऊची असताना अनेक वेळा साडेनऊपर्यंत कर्मचारी उपलब्‍ध होत नाहीत. बँक, टपाल कार्यालयातील रांगांमध्ये तासन् तास ज्‍येष्ठांना उभे राहावे लागणे दुर्दैवी आहे. पात्र ज्‍येष्ठ नागरिकांना अनेक वेळा डोअर स्‍टेप सर्व्हिस मिळत नाही. सर्व संबंधित घटकांना या प्रश्‍नांची जाणीव असणे गरजेचे झाले आहे."

- श्रीराम कातकाडे, ज्‍येष्ठ नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT