Priyanka Ghodke esakal
नाशिक

Senior Women Cricket Tournament : नाशिकचा अहमदनगर वर 158 धावांनी विजय; प्रियांका घोडकेचे विजयी शतक

सकाळ वृत्तसेवा

Senior Women Cricket Tournament : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत नाशिकने अहमदनगर संघावर १५८ धावांनी मोठा विजय मिळवला. (Senior Women Cricket iinvitational Tournament Nashik beat Ahmednagar by 158 runs Priyanka Ghodke winning century nashik news)

गरवारे मैदान , छ. संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे खेळताना प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने कर्णधार प्रियांका घोडकेच्या जोरदार नाबाद १२८ धावांच्या बळावर ५० षटकांत ३ बाद २८२ धावा केल्या.

प्रियांकाला माया सोनवणे ६० ची साथ मिळाली व दोघींनी १५८ धावांची भागीदारी केली. रसिका शिंदेने नाबाद ४० धावा केल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विजयासाठी २८३ धावांचा पाठलाग करतांना माया सोनवणे व ऐश्वर्या वाघच्या प्रभावी गोलंदाजी समोर अहमदनगर संघ ४५ . ४ षटकांत १२४ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

अहमदनगरच्या अंबिका वाटाडेने सर्वाधिक ४० धावा केल्या. माया सोनवणे व ऐश्वर्या वाघ या दोघींनी प्रत्येकी ४ तर प्रियांका घोडकेने २ बळी घेत नाशिकला १५८ धावांनी मोठा विजय मिळवून दिला.

पुढील सामना : २८ एप्रिल - नाशिक वि एम सी ए ब्ल्यु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT