Police Station esakal
नाशिक

Nashik News: सोयगावसाठी हवे स्वतंत्र पोलिस ठाणे! वर्षभरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त

योगेश बच्छाव

सोयगाव : शहरातील सोयगावसह नववसाहत परिसराचा विस्तार झपाट्याने होत असून विकासासह याठिकाणी गुन्हेगारी देखील डोके वर काढू लागल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयगावला स्वतंत्र पोलिस ठाणे कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. (separate police station for Soygaon Citizens suffer due to increasing crime during year Nashik News)

मालेगाव महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या भागात सोयगावचा देखील सहभाग आहे. महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर सोयगाव परिसरात झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे या भागात राहण्यासाठी नागरिकांकडून विशेष पसंती दिली जाते.

त्यामुळे या भागात शिकवणी, अभ्यासिका हॉस्पिटल, नोकरी व्यवसायानिमित्त ग्रामीण भागातील असंख्य वास्तव्यास आहे. त्यामुळे आता परिसरात गुन्हेगारी देखील वाढत असून घरफोड्या, चैनस्नॅचिंग, मोबाईल चोरी, मुली, महिलांची छेडछाड अशा घटना वाढू लागल्या आहे.

या भागात चोरीची घटना किंवा भांडण, तंटे झाल्यास याबाबत तक्रार करण्यासाठी थेट चार किलोमीटर दूर असलेल्या कॅम्प पोलिस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे हे नागरिकांना गैरसोयीचे ठरते.

त्यामुळे या भागातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी या भागात स्वतंत्र पोलिस ठाणे कार्यान्वित करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे. येथे नवीन पोलिस चौकी सुरू झाल्याने नागरिकांना सुरक्षा मिळणार आहे.

चैनस्नॅचिंग बनले नित्याचे

वाढत्या लोकवस्तीमुळे या भागात चोरी, लुटमारीच्या घटनांतही वाढ झाली आहे. महिला काही महिन्यांपूर्वी सोयगाव भागात दिवसाढवळ्या तरुणाच्या खुनाची घटना घडली तर दोन दिवसांपूर्वी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तर अनेक वेळा चैनस्नॅचिंगच्या घटना देखील घडल्या आहेत अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकही असुरक्षित होत चालले होते.

"सोयगावचा वाढता विस्तार लक्षात घेता येथे स्वतंत्र पोलिस चौकी व्हावी अशी अनेक व मागणी केली आहे सोयगाव नववसाहत परिसरात चैनस्नॅचिंग, मुलींची छेडछाड, चोऱ्या अशा घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोयगावच्या लोकसंख्येच्या दृष्टीने या भागात स्वतंत्र पोलिस चौकी होण्याची गरज आहे."

- शरद बच्छाव, युवा जिल्हाध्यक्ष, अखिल मराठा महासंघ

"सोयगाव परिसराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. सोयगाव परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस स्टेशनला काम पडले तर नागरिकांना कॅम्प पोलिस ठाण्यात जावे लागते. सोयगाव परिसरात एकही पोलिस चौकी नाही. त्यामुळे परिसरात पोलिस चौकी पाहिजे अशी नागरिकांची नेहमीची मागणी आहे."

- आशाताई आहिरे, माजी नगरसेविका

"प्रचंड लोकसंख्येचा भाग म्हणून सोयगाव परिसर ओळखला जातो. परिसरात बहुतांश भागात रात्री मद्यपी दारू पीत असतात. दारू पिऊन झाल्यावर ते बाटल्या तिथंच फोडतात. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे टवाळखोरांसह मद्यपी, भुरटे चोर यांचा बंदोबस्त करावा व सोयगाव नववसाहत भागात पोलिस चौकी त्वरित चालू करावी."- रमेश बच्छाव , सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT