saved cow in truck esakal
नाशिक

नाशिक : जनसेवा प्रतिष्ठानमुळे वाचले गायीचे प्राण

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : सर्वाधिक वर्दळीच्या मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव फाट्यावर अज्ञात टेंम्पोने एका गायीला (Cow) जोरदार धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने गायीला उठणे व चालणे अशक्य झाले होते. ही घटना समजताच जनसेवा प्रतिष्ठानने पदरमोड करीत गायीला नाशिक येथे गोशाळेत उपचारासाठी नेले. वेळेवर उपचार मिळाल्याने अपघातग्रस्त गायी वेळेवर उपचार मिळून जीवदान मिळाले आहे. (Seva Pratishthan saves cows life Nashik News)

या मदतकार्यात घोटी टॅबचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, उपनिरीक्षक हरी राऊत, घोटी पोलिस टॅबचे कर्मचारी राहुल गांगुर्डे, दीपक दांडेकर, सुनील खताळे, पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी तसेच इगतपुरी शहरातील राज जावरे, आकाश सोनवणे, प्रदीप राजपूत, मेहुल शहा, नरेंद्र चांडक, किरण फलटणकर तसेच वडाळा, मुंबई येथील साईभक्त आदींचे सहकार्य लाभले.

चाराटंचाईमुळे भटकंती

तालुक्यात मार्च व एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात चांगलीच वाढ झाल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच तालुक्यातील पशूंनाही बसत आहे. चाराटंचाईमुळे महामार्गालगत असणाऱ्या रायगडनगर, वाडीवऱ्हे, गोंदे, माणिकखांब, खंबाळे, तळेगाव व इतर भागातील पशुधनाची महामार्गालगत हिरव्या व लहान झाडांची पाने खाण्यासाठी वर्दळ वाढू लागली आहे. यामुळे जनावरांना अपघातांचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alcohol Limit Act: पार्टीत अडचण नको! घरी किती मद्य ठेवणे कायदेशीर आहे? नववर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी नियम जाणून घ्या

Municipal Council Election: गड राखला; पण नगराध्यक्ष गमावला! भाजपला उरण नगर परिषदेतील सत्ता राखण्यात यश

सचिन पिळगांवकरांना सुद्धा लागलं FA9LA गाण्याचं वेड, सुप्रियासोबत केला भन्नाट डान्स, viral video

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला- चंद्रशेखर बावनकुळे

Ichalkaranji Muncipal : इचलकरंजीत भाजपची कसोटी; नवे-जुने संघर्षामुळे निवडणूक रंगात

SCROLL FOR NEXT