old man in curfew.jpg
old man in curfew.jpg 
नाशिक

#Coronafighter : कर्फ्यूतही सत्तरीतला "तरुण" निभावतोय आपले कर्तव्य! जिद्दीला सलाम!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / कळवण : एकीकडे संपूर्ण देशात कोरोनामुळे भयावह परिस्थिती असताना आणि देशभरात लॉकडाउन सुरू असताना अत्यावश्‍यक सेवा म्हणून मेडिकल स्टोअर्स सुरू असून, कळवण शहरातील वयाच्या सत्तरीत असलेला "तरुणा'ने प्रत्येक मेडिकलमध्ये बाहेरगावाहून आलेले पार्सल सोडविण्याचे गेल्या 20 वर्षांपासूनचे काम संचारबंदीतही अखंडपणे सुरू ठेवले आहे. 

वीस वर्षांपासून सुभाष काळेंची अखंड सेवा 
मूळचे सिन्नर तालुक्‍यातील आणि लहानपण मुंबईत गेलेले सुभाष नरहरी काळे ऊर्फ काळेनाना 72 वर्षांचे अवलिया व्यक्तिमत्त्व. काळेनाना 20 वर्षांपूर्वी रोजगारानिमित्त कळवणला आले आणि इथल्याच मातीशी त्यांची नाळ जोडली गेली ती कायमचीच. सकाळी घरोघरी वर्तमानपत्रे पोच करायची आणि दिवसभर मेडिकल व्यावसायिकांकडे पार्सल पोचवायचे हे नानांचे काम गेल्या 20 वर्षांपासून अखंड सुरू आहे. कडक ऊन असो, मुसळधार पाऊस असो की कडाक्‍याची थंडी या कशाचीही तमा न बाळगता आपल्या कामाशी इमान ठेवणारा हा माणूस संचारबंदीच्या काळातही आपले कर्तव्य इमानेइतबारे निभावत आहे. नाना आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी नानी हेच त्यांचे दुहेरी कुटुंब. अपत्य नसल्याची खंत मनात असली तरी जे नाही त्यावर कुढत बसण्यापेक्षा आयुष्याचा मनमुराद आनंद लुटणारे काळेनाना अविरत संघर्षावर मात करत सत्तरीतही हिमतीने लढणारा अस्सल माणूस म्हणून कळवण परिसरात परिचित आहेत. 

ना त्यांचे कोणी नातलग आहे ना आप्तेष्ट
आजतागायत सायकल अथवा कुठल्याही वाहनाशिवाय आपली कामे पायी जाऊन पूर्ण करताना त्यांची उमेद तरुणांनाही लाजवणारी ठरते. कळवणमध्ये ना त्यांचे कोणी नातलग आहे ना आप्तेष्ट. मात्र त्यांचा मित्रपरिवार हाच त्यांनी जमविलेला मोठा गोतावळा आहे. कधी डोक्‍यावर वजनदार खोकी, तर कधी खास बनवून घेतलेल्या चारचाकी छोट्या हातगाडीवर मोठे पार्सल ठेवून ते प्रत्येक मेडिकलमध्ये पोच करणाऱ्या काळेनानांची संचारबंदीतही सुरू असलेली कर्तव्यतत्परता निश्‍चितच कौतुकास्पद ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT