water scarcity
water scarcity esakal
नाशिक

नाशिक : रातीरला भीषण पाणीटंचाई; रणरागिनींनी काढला हंडा मोर्चा

दीपक खैरनार

अंबासन (जि.नाशिक) : उन्हाच्या तीव्र झळा वाढू लागताच कुपनलिका, विहिरीतील पाणी खोलखोल जाऊ लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील काही गावांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत असल्याने रातीर (ता.बागलाण) येथील महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत सदस्यांना कार्यालयात कोंबले यामुळे सदस्यांची नामुश्की ओढावली होती. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रातीर (ता.बागलाण) येथील ग्रामपंचायत कार्यालयात नेहमीप्रमाणेच सदस्यांचे कामकाज सुरू असतानांच गावातील महीलांनी पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढत एकच कल्लोळ केला. संतप्त रागरगिंनींनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून ग्रामपंचायत सदस्यांना जाब विचारत कोंबण्यात आले होते. ग्रामपंचायत प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी याआधीच प्रशासनाच्या टँकरसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात आले. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई (water scarcity) पाचवीलाच पुजलेली असूनदेखील प्रशासनाकडून ठोस असा निर्णय होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विहीरी, कूपनलिका तसेच गावातील हातपंपांनी आदीच माना टाकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वखर्चाने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपासून वीजेचा लपंडाव यामुळे टँकर येऊ शकले नाही त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. परिसरात रातीर, रामतीर, सुराणे, वायगाव, सातमानेपर्यंत पाणीटंचाईची दाहकता दिसून येत आहे. सुराणे गावानजीक चिरखांड धरण असूनही गेल्या पंचवीस वर्षांपासून कोरडे ठाक पडले आहे. प्रशासनाकडून गंभीर दखल घेत गावाला टॅकर सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कालव्याच्या प्रतिक्षेत

गेल्या पन्नास वर्षांपासून या परिसरातील नागरिक प्रलंबित असलेला हरणबारी उजवा कालव्याच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान संघर्ष समितीसह नागरिकांकडून कालव्याच्या कामासाठी अटोकाट प्रयत्न सुरूच असून कालव्याचे काम झाल्यास लाभक्षेत्रातील सर्व गावांना फायदेशीर ठरणार आहे व कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. प्रशासनाने दखल घेऊन प्रतिक्षेत असलेला कालव्याकडे लक्ष घालावे असे नागरिकांकडून सांगितले जाते.

मागील २०२१ मधील पाणीटंचाईग्रस्त गावे

रातीर, वघाणेपाडा, नवेगाव, चिराई, राहुड, महड, बहिराणे, कातरवेल, या गावात प्रशासनाकडून सहा टॅकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता.

यावर्षी २०२२ टॅकरसाठी प्रस्ताव

रातीर, रामतीर मंजूरीसाठी प्रांत कार्यालयाकडे सादर तर सुराणे तहसील कार्यालयास सादर

नवेगाव, कातरवेल प्राप्त तसेच सारदे, दोधानपाडा टॅकरसाठी संभाव्य आहे.

आम्ही गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी वरिष्ठांकडे टँकरसाठी प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच गावाला प्रशासनाकडून टॅकर सुरू करण्यात येईल.

-समाधान आहिरे, ग्रामपंचायत सदस्य, रातीर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT