Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : दिव्यांग वृद्धेवर लैंगिक अत्याचार; नराधम तरुणाला 2 तासात अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पुणे रोडवरील जेतवननगरमध्ये घरात घुसून दिव्यांग वृद्धेवर २३ वर्षीय नराधम तरुणाने दगडाचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी घटना उघड होताच दोन तासांत संशयित तरुणाला अटक केली. (Sexual assault on disabled elderly woman Murderous youth arrested in 2 hours Nashik Crime News)

साहिल आवारे (रा. जेतवननगर, पुणे रोड, उपनगर) असे संशयित नराधम तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय पीडितेने फिर्यादी दिली आहे. पीडित वृद्धा ही सोमवारी (ता. ९) आपल्या घरात झोपली होती.

मध्यरात्री संशयित आवारे हा तिच्या घरात शिरला. त्याने दगडाचा धाक दाखवून, दमदाटी करीत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो पसार झाला. दरम्यान, पीडितेने सदर संपूर्ण प्रकार भावाला व जवळच्या नातलग महिलेला सांगितला.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असता, परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यास अटक करण्यात आली.

याप्रकरणी उपनगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आवारे हा रंगारी म्हणून रोजंदारीवर काम करतो. तसेच तो व्यसनाधीन असून त्याचे त्याच्या आई- वडिलांसोबतही भांडण करीत असल्याचे चौकशीतून समोर आली आहे. त्यास अटक करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

BSF Martyr Suresh Ambadkar: भारत-बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना कुरखेड्याचा बीएसएफ जवान सुरेश आंबडर हुतात्मा

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT