95 year old Raghunath Haribhau Kadlaskar with actor aarush
95 year old Raghunath Haribhau Kadlaskar with actor aarush esakal
नाशिक

शंकर महाराजांचे समकालीन भक्त ‘योग योगेश्‍वर जय शंकर’च्या सेटवर

ब्रिजकुमार परिहार

नाशिक : ‘योग योगेश्‍वर जय शंकर’ या मालिकेचे चित्रीकरण (marathi serial shooting) सध्या नाशिकमध्ये वडनेरगेट परिसरात सुरू आहे. या मालिकेद्वारे सद्‌गुरू श्री शंकर महाराज यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविला जात आहे. महाराजांवर जसा बालपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद होता, तसाच कृपाशीर्वाद शंकर महाराजांचा त्यांच्या भक्तांवर आहे. अशा हजारो भक्तांपैकी एक म्हणजे सोलापूर येथील रघुनाथ हरिभाऊ कडलस्कर (पेंटर काका) यांनी नुकतीच येथील चित्रीकरणाच्या सेटवर सदिच्छा भेट दिली. (Shankar Maharajs contemporary devotee on set of Yoga Yogeshwar Jai Shankar marathi serial Nashik News)

पेंटर काकांना वयाच्या तिसऱ्या- चौथ्या वर्षांपासून वीस वर्षांपर्यंत शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे. सोलापूरमध्ये शुभराय मठात आणि जक्कल मळ्यात हा सहवास त्यांना लाभला. त्यातूनच त्यांचे आयुष्य भक्तिमय झाले. १९४७ मध्ये महाराजांनी धनकवडी येथे समाधी घेतली. त्या वेळी पेंटर काकांचे वय अवघे २० वर्ष होते. आज ते तब्बल ९५ वर्षांचे असून, ‘योग योगेश्‍वर जय शंकर’ या मालिकेबाबत समजताच त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी पुत्र विजूदादा कडलस्कर यांच्या सहकार्याने थेट नाशिक गाठले अन्‌ चित्रीकरणाच्या ठिकाणी (सेटवर) बालशंकरच्या भूमिकेत आरूषला पाहून त्यांना गहिवरून आले. काकांच्या या भेटीत त्यांचे शंकर महाराजांवर असलेले अफाट प्रेम दिसून आले.

मालिकेच्या सेटवर पेंटर काकांनी बालशंकर आरूषला पाहताक्षणी मिठीत घेतले आणि महाराजांचा पुन्हा एकदा सहवास लाभल्याचे भावनोत्कट उद्‌गार त्यांनी काढले. पेंटर काकांनी महाराजांशी प्रत्यक्ष भेटीदरम्यानचे काही अनुभव कथन केले. त्यांचे पुत्र विजूदादा यांनीही शंकर महाराज आणि भस्मे काका, मधुबुवा, जक्कल काका, श्री. प्रधान, श्री. आशर, श्री. गिरमे काका यांच्या आणि पेंटर काकांच्या समोर घडलेल्या चमत्कारांविषयीच्या आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या. पेंटर काका आणि बालशंकर यांच भेट पाहून सेटवरील सर्व कलाकार आणि संपूर्ण टीमला विलक्षण आनंद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT