State Vice President Sharad Aher, former minister Balasaher Thorat along with office bearers of Nashik who participated in Bharat Jodo Yatra. esakal
नाशिक

Bharat Jodo Yatra : नांदेडला भारत जोडो यात्रेत नाशिकचे पदाधिकारी सामील

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारत जोडो यात्रेसाठी नाशिक येथून काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ पदाशिकारी नांदेड येथे आज सकाळी रवाना झाले. मुख्य जबाबदारी हिंगोलीत असल्‍यामुळे नाशिक येथून मोठया प्रमाणात कार्यकर्ते रवाना होणार आहेत. या यात्रेत नाशिकच्या कार्यकर्त्‍यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेत हिंगोलीसाठी रवाना झाले. (sharad aher balasaheb thorat Nashik participate in Bharat Jodo Yatra to Nanded Nashik News)

राहुल गांधी यांच्या महाराष्‍ट्रातील यात्रेसाठी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रवक्‍त्‍या डॉ. हेमलता पाटील, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह नाशिकमधील अनेक पदाधिकारी नांदेडला गेले आहेत. प्रदेश पदाधिकाऱ्यांवर संयोजनाच्या जबाबदाऱ्या असून शरद आहेर यांच्याकडे अतिमहत्‍वाच्या व्यक्‍तींच्या दौऱ्याबाबतचे नियोजन करणाऱ्या समितीचे सदस्‍यपद आहेत. त्‍यामुळे नांदेडपासूनच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यात्रेत सहभाग घेतला आहे. काँगेसचे पदाधिकारी सुरेश मारु आणि उद्धव पवार यांनी यात्रेसाठी खास टीर्शट तयार करून घेतले आहेत.

या शर्टवर तिरंगा ध्वजाचे व भारत जोडो यात्रा असे छापण्यात आले आहे. तो परिधान करून यात्रेत सुरेश मारू व उद्धव पवार सहभागी झालेत. माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची त्‍यांनी भेट घेतली. नाशिकच्या कार्यकर्त्यांवर हिंगोली येथील दौऱ्याची जबाबदारी असून हिंगोली व अकोला या भागातील यात्रेत नाशिकमधील सर्व कार्यकर्ते सहभागी होणार असल्‍याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Arunachal Pradesh and China : ‘’अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न अन् अविभाज्य भाग’’ ; भारताने चीनला कडक शब्दांत सुनावलं!

Suryakumar Yadav Prediction : ‘T20 World Cup 2026’चं शेड्यूल जाहीर होताच, कॅप्टन सूर्याने थेट फायनल मॅचबाबत केलं भाकीत!

Supriya Sule: बिनविरोध निवडणुकांवर सुप्रिया सुळेंचा 'आक्षेप'; राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Pune University :पुणे विद्यापीठात बिबट्या वावराच्या चर्चा; सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका; विद्यापीठाचे आवाहन!

Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT