land esakal
नाशिक

Nashi news : आपसांत मिटतील शेतीतील वैरभावना : शरद घोरपडे

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये जुने भाऊबंदकीत वाद असतात. बऱ्याच वेळा हे वाद विकोपाला जाऊन अनर्थ घडतो. हे अपापसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी शासनाकडून सलोखा योजनेची सुरवात करण्यात आली आहे.

असे वाद मिटविण्यासाठी तहसील कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले आहे. (Sharad Ghorpade statement Animosity in agriculture will be resolved Nashik news)

एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र १ हजार रुपये व नोंदणी शुल्क नाममात्र १ हजार रुपये आकारण्याबाबत सवलत या योजनेतून देण्यात आली आहे.

सलोखा योजना राबविण्यास महसूल व वन विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. लाभ घेण्याकरिता दोन्ही शेतकऱ्यांचा एकमेकांच्या जमिनीवरील ताबा किमान १२ वर्षांपासून असणे आवश्यक राहील.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

योजनेमुळे अपापसातील पिढीजात वैरभावना संपुष्टात येऊन ताबा व मालकी याबाबतचा संभ्रम नष्ट होईल. सकारात्मक मानसिकता होऊन जमिनीच्या विकासाला चालना मिळेल. शेतकऱ्यांचे वैयक्तिक व राष्ट्रीय उत्पादनात वाढ होऊन विविध न्यायालयामध्ये प्रलंबित दावे निकाली निघणार आहे.

"सलोखा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपसांतील वाद मिटवून सामाजिक सलोखा वाढविण्यास हातभार लावावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयाशी संपर्क करावा."

- शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT