Sharad Pawar Sabha Yeola 
नाशिक

Sharad Pawar Sabha Yeola: वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल... भुजबळांच्या पिचवर पवारांची तुफान बॅटिंग

Sandip Kapde

Sharad Pawar Sabha Yeola: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांनी येवल्यात पहिली सभा घेतली. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात आपली ताकद दाखवली आहे. त्यांनी अजित पवार गटाला नाव न घेता सुनावले आहे. 

यावेळी शरद पवार म्हणाले, अनेक संकटात काही सहकाऱ्यांनी साथ सोडली नाही. नाशिक जिल्ह्याने काय पुरोगामी विचारांना साथ दिली. मी आज इथ टीका करायला नाही, माफी मागायला आलो आहे. माझा अंदाज कधी चुकत नाही. मात्र इथ(छगन भुजबळ) माझा अंदाज चुकला.

लोकांसमोर जायची वेळ येईल तेव्हा पुन्हा येईल मात्र तेव्हा चूक करणार नाही. सध्या कांद्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. सामन्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण करणार आहे. या मतदार संघाचा इतिहास मोठा आहे.

चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर दुरस्त केल्या पाहीजेत. मोदी यांनी राष्ट्रवादीवर हल्ला केला, आरोप केला. मी पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सांगतो त्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर नरेंद्र मोदी यांना माझे आव्हान आहे. तुम्ही सत्तेत आहात. सर्व सत्ता वापरा आणि चौकशी करा, कोणी भ्रष्टाचार केला असेल तर शिक्षा द्या. आमचा तुम्हाला पाठिंबा राहील, असे शरद पवार म्हणाले. (Nahisk latest news)

शरद पवार म्हणाले, मी व्यक्तिगत बोलणार नाही. येवल्याचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहोत. काही लोक म्हणतात माझे वय झाले. वय झाले हे खरं आहे. वय ८२ झाले. पण गडी काय आहे तु पाहीलं कुठं?

उगाच वयाच्या उल्लेख करु नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल. पुन्हा असा विचार करु नका, धोरणात्मक टीका करा. कामावर टीका करा. पण वैयक्तिक टीका करु नका. वय आणि वैयक्तिक हल्ला आम्हाला शिकवला नाही. यशवंतराव चव्हाण यांची ही शिकवण नाही, असे शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवारांना सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT