Sharad pawar esakal
नाशिक

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या संधी उध्वस्त करणे हेच सरकारचे धोरण : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शेतमालाला चांगली किंमत मिळावी. शेतीसाठी पाणी मिळावे आणि बाजारपेठेची व्यवस्था यासाठी आम्ही काम केल्याने शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने देशातील शेतीविषयक चित्र बदलले. (sharad pawar statement about government policy to destroy farmers opportunities nashik news)

आता मात्र शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवण्याऐवजी त्यांच्या संधी उध्वस्त करणे हे सरकारचे धोरण बनले आहे, अशी घणघणाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. तसेच शेतकरी विरोधी राजकर्त्यांना सत्तेपासून दूर ठेवावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

देवरगाव (ता. नाशिक) येथे आदिवासी आश्रमशाळा आणि मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमीपूजन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार ॲड्. माणिकराव कोकाटे,

‘मविप्र'चे सरचिटणीस ॲड्. नितीन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते. निर्यातीला नाही, तर आयातीला प्रोत्साहन दिले जात आहे, असे सांगून श्री. पवार यांनी कांदा आणि टोमॅटोचे उदाहरण दिले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आमदार अहिरेंमुळे विकास

प्रश्‍नांची जाण, कर्तृत्ववान असलेल्या आमदार अहिरे यांच्या माध्यमातून या भागात विकास पाहावयास मिळत आहे. बालाजी संस्थानचा प्रश्‍न सुटल्याने दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांना फायदा झाला.

नाशिक साखर कारखान्याचे दुखणे त्यांनी सांगितल्यावर वसंतदादा इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ पाठवले होते. त्यामुळे कारखाना सुरु होण्यासाठी मदत झाली. आणखी अडचणी दूर होतील. त्याचप्रमाणे आदिवासी भागातील जनतेच्या पिण्याचे पाणी, वीज, शिक्षण या प्रश्‍नांसाठी आमदारांनी निधी आणला, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांकडे पाहण्याचा सरकार आणि सगळ्यांचा दृष्टीकोन बदलायला हवा. कारण स्वातंत्र्यासाठी या समाजाचे मोठे योगदान आहे, असे सांगून श्री. भुजबळ यांनी बाजार समित्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांवर चालवण्यासाठी विजय मिळवून द्यावा, असे आवाहन केले.

निर्यात बंद आणि आयात सुरु अशा सरकारच्या धोरणामुळे शेतीपुढे प्रश्‍न तयार झाले असल्याची टीका करत श्री. भुजबळ यांनी द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्‍नांना वाट करुन दिली. जातींमध्ये तंटे, मारामाऱ्या लावून देत भावनेत जनतेला गुंतवणूक मते घेतली जातात. त्यामुळे भावनेतून कुटुंबाचे पोट भरत नाही हे साऱ्यांनी ध्यानात घ्यावे याकडेही श्री. भुजबळ यांनी लक्ष्य वेधले.

शरद पवारांमुळे स्वतंत्र ‘बजेट'

राज्याचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्यामुळे आदिवासींसाठी स्वतंत्र ‘बजेट' मिळाले. खावटी, वैयक्तिक लाभाच्या योजना सुरु झाल्या. त्यानंतर ठक्कर बाप्पा योजनेसाठी ३१ लाख ३५ हजारांचा निधी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक कोटी, ७५ लाख, ५० लाख असा केला, असे सांगत श्री. झिरवाळ यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावातील इंग्रजी अक्षरांमुळे शिक्षणाचे कसे प्रश्‍न तयार होताहेत याची उदाहरणे दिली. रशियात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना परत यावे लागले, असेही त्यांनी सांगितले.

विकासाचा अनुशेष भरण्याचा प्रयत्न

देवळाली विधानसभा मतदारसंघातील ३० वर्षांचा विकासाचा अनुशेष भरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगून आमदार अहिरे म्हणाल्या, की मागील अडीच वर्षांमध्ये पाचशे कोटींचा निधी मतदारसंघासाठी मिळवला. ६६७ विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा संकुलासाठी १९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून दीड वर्षात काम पूर्ण होईल.

याशिवाय माझ्या मतदारसंघात ६ धरणे असले, तरीही स्थानिकांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे ५५ गावांसाठी १०६ कोटींच्या जलजीवन योजनेची कामे मंजूर करुन घेतली. व्यंकटेश बालाजी देवस्थानचे विहितगावच्या सात-बारा उताऱ्यावर नाव हटल्याने शेतकऱ्यांवरील अन्याय दूर झाला.

भोकरपाडा इथे वीज पोचवली. ओझरखेड पुलासाठी साडेआठ कोटी मंजूर झाले आहेत. आता एकलहरे येथील औष्णीक वीज केंद्रासाठी ६६० मेगावॉटचा संच मिळण्यासाठी केंद्राचे निर्बंध हटवण्यासाठी मदत व्हावी. श्री. विष्णूपंत म्हैसधुणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

अन फडणवीसांना केले कबुल

आदिवासींसाठीचा ‘नॉन प्लॅन'मधील २ हजार ८६३ कोटींचा निधी परत आदिवासींसाठी मिळवायचा होता. मात्र मंत्री तयार होत नव्हते. मग आपण काय केले याचे कथन आपल्या ‘स्टाईल'मध्ये श्री. झिरवाळ यांनी केले.

ते म्हणाले, मी पीठासीन अधिकारी. आमदारांना त्याबद्दल बोलायला लावले. मग मंत्री बोलायला उभे राहिले. त्यांना खाली बसवले आणि श्री. अजित पवार उभे राहिले आणि आम्ही केले असे सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ दिवसात निधी परत देतो असे कबुल केले.

भुजबळांचे चौकार अन षटकार

श्री. छगन भुजबळ यांनी भाषणावेळी शब्दरुपी चौकार अन षटकार ठोकले. विधीमंडळाच्या अधिवेशनावेळी आम्ही ‘कांदे, कांदे, कांदे' असे म्हणत कांद्याच्या पडलेल्या भावाबद्दल आवाज उठवत होतो, असे सांगत असताना श्री. भुजबळ यांनी जिल्ह्यात दुसरे कांदे आहेत, असे म्हणत, ‘शेतातील कांदे' असा उल्लेख आवर्जून केला.

तसेच श्री. विष्णूपंत म्हैसधुणे यांचा उल्लेख करत असताना श्री. भुजबळ यांनी गाईचे महत्व वाढले असल्याने गाईधुणे व्हायला सांगितले, तरीही ते म्हैसधुणे म्हणतात, असे स्पष्ट केले. या दोन्ही शाब्दीक कोटींवेळी उपस्थितांमध्ये हंशा पिकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT